गुजरातहून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळलं. संपूर्ण देशासाठीच हा काळा दिवस ठरला. एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. कोणी आपल्या कुटुंबाला भेटायला, कोणी नवऱ्याला, कोणी शिक्षणासाठी तर कोणी फिरायला जात होतं. काही क्षणांमध्ये सगळ्यांच्या स्वप्नांवर आभाळ कोसळलं. आतापर्यंत या दुर्घटनेत २६५ लोकांना मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण देश याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत. कलाकार मंडळींनीही सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं. कॉमेडी क्वीन भारती सिंहनेही याविषयी दुःख व्यक्त करता तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. (Bharti singh troll)
‘लाफ्टर शेफ सीझन २’ शोच्या चित्रीकरणासाठी भारती पोहोचली होती. सुंदर ड्रेसमध्ये ती शूटसाठी तयार झाली. दरम्यान शूटसाठी जात असताना सेटवरच पापाराझींनी तिला घेरलं. नेहमीप्रमाणे भारती सगळ्यांना भेटली. पापाराझींनी तिच्याबरोबर मजा-मस्ती करण्यास सुरुवात केली. मात्र भारती या सगळ्यांना असं कृत्य करण्यापासून थांबवलं. हात जोडून नम्र विनंती केली. अहमदाबादमधील विमान अपघात घटनेमुळे भारती दुखावली होती.
भारतीने पापाराझींना म्हटलं की, “आज खरंच मूड नाही. अजिबातच मजा-मस्ती करण्याचा मूड नाही. अरे काल एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. खूप वाईट घटना घडली. मला पहिल्यापासूनच फ्लाइटमध्ये बसण्याची भीती आहे. आता माझ्या मनातील ही भीती आणखीनच वाढली आहे. कालही पॉडकास्मध्ये माझं मन लागलं नाही. आजही शूट आहे. कामात मनच लागत नाही. मित्रांनो माफी मागते पण आज मन नाही”. भारतीने सगळ्यांसमोर हात जोडत माफी मागितली आणि तिथून निघून गेली.
आणखी वाचा – Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण
यावेळी भारती भावुकही झाली. पण तिचं हे वागणं बहुदा नेटकऱ्यांना पटलं नाही. विविध कमेंट करत भारतीला ट्रोल करण्यात आलं. ड्रामा करत आहे, तुला इतका ड्रामा करण्याची गरज काय?, मूड नाही म्हणते आणि इतका मेकअप केला आहेस, तुझं नाटक बंद कर, मॅडमचं मन लागत नाही आणि पोझ देत आहे, अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. यावर नेटकऱ्यांनी सध्यातरी मौन पाळलं आहे.





