शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2025 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karisma Kapoor Sanjay Kapur Wedding Video

Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण

Karisma Kapoor Sanjay Kapur Wedding Video : करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर आता या जगात नाहीत. वयाच्या ५३ व्या वर्षी संजय कपूर यांचा पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. संजय कपूरच्या मृत्यूच्या बातमीच्या दरम्यान, त्या काळात२२ वर्षीय करिश्माचा लग्नाचा व्हिडीओ आणि काही फोटो बरेच व्हायरल होत आहेत. करिष्माच्या लग्नातील या फोटोंमध्ये करीना कपूरने करिश्मापेक्षा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यात ती वधूच्या तुलनेत अधिक सुंदर दिसत होती. लग्नातील समोर आलेल्या फोटोंमध्ये नव्या जीजूंबरोबर करीनाला वावरणं थोडं अवघड जात असल्याचंही दिसलं.

करीनाने आपल्या बहिणीच्या लग्नात हिरव्या रंगाचा डिझाइनर लेहेंगा परिधान केला होता. २००३ मध्ये करिश्मा आणि संजय यांच्या लग्नादरम्यान, करीना त्यांच्या मागे मध्यभागी बसलेली दिसली. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये, वधू करिश्मा कपूर गुलाबी लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्याच वेळी, करीना वारंवार तिचा डोक्यावर घेतलेला पदर सावरताना दिसत आहे. ज्यामुळे लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्यतिरिक्त, करिश्मा या व्हिडीओमध्ये लाजताना दिसली आहे. लग्नानंतर निरोपावेळी आई बबिता करिष्माचे लाड करताना आणि काळजी व्यक्त करताना दिसत आहे.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मराठी कलाकारही हळहळले, श्रद्धांजली वाहत थेट परमेश्वरालाच केला सवाल

View this post on Instagram

A post shared by DeepDream 💙✨ (@deepxedits8)

या व्यतिरिक्त, ऋषी कपूर, राजीव कपूर, रितू नंदा, रीमा कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्यही या व्हिडीओमध्ये खूप आनंदी आहेत. या व्हिडीओमध्ये करीना कपूरला पाहून लोक म्हणाले, “करीनाकडे पहा, बेबोने डोक्यावरुन पदर का घेतला आहे”. दुसरा म्हणाला, “करीना काकूसारखी का दिसत आहे?”. तर दुसऱ्या एका नेटकाऱ्याने म्हटलं आहे की, “अरे देवा, डोक्यावरुन पदर घेऊन करीना”. त्याच वेळी, बर्‍याच लोकांनी म्हटले आहे, “करिश्माने चुकीचा माणूस निवडला”. तर आणखी एकजण म्हणाला, “सर्व काही ठीक आहे पण करीना वधू बनून का आली आहे?”.

आणखी वाचा – अहमदाबाद विमान अपघातानंतर विक्रांत मेस्सीवर दुःखाचा डोंगर, जवळच्या वक्तीचे निधन, म्हणाला, “माझे काका…”

एका नेटकऱ्याने करीनावर टिप्पणी करत म्हटलं, “करीना युपी साईडला होणाऱ्या लग्नातील टिपिकल सून दिसत आहे”. करिष्माच्या लग्नातील काही फोटोंमध्ये करीना तिचे जीजू संजय कपूरबरोबर पोज देताना दिसली. संजय कपूरच्या मृत्यूची बातमी ऐकून करीना रात्री उशिरा करिश्माच्या घरी तिचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली. यावेळी सैफ अली खानही तिच्याबरोबर होता. कॅमेरा पाहिल्यानंतर करीना आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न करीत होती आणि ती खूप दु: खी दिसत होती.

Tags: kareena kapoorkarisma kapoorsanjay kapoor death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
karisma kapoor ex husband last post

तीन दिवसांपूर्वीच करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीला स्वतःच्या मृत्यूबाबत माहित होतं?, ‘ती’ पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.