शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करिश्मा कपूरने संजय कपूरला ‘या’ कारणास्तव दिलेला घटस्फोट, अखेर अभिनेत्रीलाच मिळाला मुलांचा ताबा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2025 | 6:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Karisma Kapoor-Sanjay Kapoor Divorce Reason

करिश्मा कपूरने संजय कपूरला 'या' कारणास्तव दिलेला घटस्फोट, अखेर अभिनेत्रीलाच मिळाला मुलांचा ताबा

Karisma Kapoor-Sanjay Kapoor Divorce Reason : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. पोलो खेळत असताना संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. आणि त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी जगाला निरोप दिला. संजय कपूरने २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केले, परंतु लग्नाच्या १३ वर्षांनी २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करिष्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. करिष्मा कपूर व संजय कपूर यांनी मुंबईत अगदी धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली. परंतु या दोघांच्या नात्यात लग्नानंतर अनेक अडचणी येऊ लागल्या आणि अभिनेत्रीने घटस्फोटासाठी अर्ज केला. करिश्माने संजयवर गंभीर आरोप केले होते, ज्यात शारीरिक त्रासाचा, घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला.

माध्यमांच्या वृत्तानुसार, करिश्मा कपूर हिने संजय कपूरवर आरोप केला की, व्यावसायिकाने हनीमूनच्या वेळी अभिनेत्रीचा लिलाव केला. अभिनेत्रीने असा दावा केला होता की संजयने तिला तिच्या मित्राबरोबर संबंध ठेवायला भाग पाडले होते, ज्यासाठी त्याच्याकडून किंमत घेतली होती. २०१६ मध्ये करिश्माने संजय आणि त्याच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला.

आणखी वाचा – “स्क्रीनची, जेवणाची अवस्था…”, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर कोकण हार्टेड गर्लने दाखवली वस्तुस्थिती, एअर इंडियाची पोलखोल…

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना दोन मुले आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनंतर, दोघांनाही २००५ मध्ये अदारा नावाची मुलगी झाली. २०११ मध्ये करिश्मा आणि संजय यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव कियान असे आहे. जेव्हा करिश्माने घटस्फोटाचा खटला दाखल केला तेव्हा तिने मुलांचा ताबा मागून घेतला. कोर्टाने अभिनेत्रीच्या बाजूने निकाल देऊन दोन्ही मुलांचा ताबा तिला दिला.

आणखी वाचा – “विमान कोसळलं आणि…”, अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या ‘त्या’ प्रवासाने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाला, “मीही मरणार होतो पण…”

संजय कपूरच्या घटस्फोटानंतर करिश्मा कपूरने पुन्हा लग्न केले नाही. ती सिंगल मदर म्हणून आपल्या दोन्ही मुलांना वाढवत आहे. घटस्फोटाच्या एका वर्षानंतर संजय पुन्हा प्रेमात पडला आणि त्याने तिसऱ्यांदा प्रिया सचदेवशी लग्न केले. करिश्माआधीही संजयने फॅशन डिझायनर नंदिता महातानीशी लग्न केले होते.

Tags: karishma kapoor divorcekarisma kapoorsanjay kapoor death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
ahmedabad plane crash details

अहमदाबादमध्ये विमान कोसळण्यापूर्वी त्या ३३ सेकंदांमध्ये नक्की काय काय घडलं?, धडकी भरवणारं सत्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.