क्षणात होत्याचं नव्हतं होतं त्यामुळे जगून घ्या हे वाक्य आपण थोरल्या मंडळींकडून सतत ऐकत आलो आहोत. बऱ्याचदा या वाक्यात तथ्यही आहे याचा अनुभव अनेकांना बहुदा आला असावा. अशीच काहीशी घटना करिश्मा कपूरबाबत घडली आहे. करिश्माचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं पोलो खेळ खेळत असताना अचानक निधन झालं. अवघ्या ५३व्या वर्षी त्यांना आपला जीव गमवावा लागला. काही तासांपूर्वी ते सोशल मीडियावरही सक्रिय होते. आता संजय यांची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवरुन संजय यांना त्यांच्या मृत्यूची चाहुल लागली होती का? असा प्रश्न समोर येत आहे. (karisma kapoor ex husband last post)
संजय अगदी शानमध्ये त्यांचं आयुष्य जगत होते. आयुष्याकडे बघण्याचा, जगण्याचा त्यांचा दृष्टीकोनही सकारात्मक होता. संजय यांनी मृत्यूच्या काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबात ही पोस्ट होती. त्यांनी अपघातात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्हीही उभे आहोत असं त्यांनी पोस्टद्वारे म्हटलं होतं. मात्र निधनाच्या तीन दिवसांपूर्वी संजय यांनी जीवन आणि मरण यासंदर्भात केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या मृत्यूचं धक्कादायक खरं कारण समोर, हृदयविकाराचा झटका आला पण…
Progress demands bold choices, not perfect conditions. #MondayMotivation pic.twitter.com/vapd8KkOuU
— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 9, 2025
संजय यांनी तीन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “या पृथ्वीवर तुमचा वेळ मर्यादित आहे. ‘काय होईल जर’ या विचारांमध्ये अडकण्यापेक्षा ‘का नाही?’ यावर विचार करा आणि पुढे व्हा”. संजय यांची ही तीन दिवसांपूर्वीच पोस्ट आणि त्यांच्या निधनाचं कनेक्शन नक्की काय होतं? अशा विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय यांना त्यांच्या मृत्यूचीही चाहूल लागली होती का? असं नेटकरी कमेंट करत विचारत आहेत.
संजय इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळ खेळत होते. दरम्यान खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अचानक ते घोड्यावरुन खाली कोसळले. लगेचच संजय यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र त्यांच्या जीव वाचवण्यात डॉक्टर अयशस्वी ठरले. २००३मध्ये करिश्मा व संजय यांचा विवाह थाटामाटात झाला. जून २०१६मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.





