शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजूनही व्हेंटिलेटरवर असून…”, CID फेम फ्रेडरिक्सच्या प्रकृतीबाबत दयानंद शेट्टींंचा मोठा खुलासा, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका आला नाही तर…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 4, 2023 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
cid fame actor dyanand shetty refues rumours of dinesh phadnis aka frederic suffering from heart attack

"अजूनही व्हेंटिलेटरवर असून…", CID फेम फ्रेडरिक्सच्या प्रकृतीबाबत दयानंद शेट्टींंचा मोठा खुलासा, म्हणाले, "हृदयविकाराचा झटका आली नाही तर…"

‘सीआयडी’ या लोकप्रिय शोचे अनेक चाहते आहेत. गेली अनेक वर्ष या शोने व शो मधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे. या शोमधील अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. अशातच या शो मधील एक मुख्य कलाकार इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ ​​दिनेश फडणीस यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना काल (३ डिसेंबर) हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून मरणाशी झुंज देत असल्याचे म्हटले जात आहे. (CID fame Dinesh Phadnis Heart Attack)

अशातच अभिनेते दयानंद शेट्टी यांनी दिनेशच्या प्रकृतीबाबत अपडेट देत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की, “दिनेश फडणीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त खोटं असून त्याच्यावर सध्या इतर आजारावरील उपचार सुरू आहेत. सध्या यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याची आम्ही वाट बघत आहोत. त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करुयात” असेही त्यांनी म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)

आणखी वाचा – “त्रास होऊनही भाडं…”, गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मानसिक आरोग्यावर परिणाम…”

दिनेश यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. या शोमधील त्याच्या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. त्याने या शोमध्ये अनेक वर्षे काम केले. या शोमधील त्याची हलकी फुलकी कॉमेडीही चाहत्यांना आवडली होती. ‘सीआयडी’ व्यतिरिक्त ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्येही दिसले होते. या शोमध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. पण त्यांच्या छोट्याश्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.  

आणखी वाचा – हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, “ताईची…”

दरम्यान, त्यांच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या वृत्ताने चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यांचे अनेक चाहते त्यांच्या तब्येतीच्या वृत्ताने आश्चर्यचकित झाले. अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. नव्वदीपासून अविरत मनोरंजन करणारा हा अभिनेता बराच काळ मनोरंजसृष्टीपासून लांब आहे.   

Tags: cidcid actordinesh phadnisentertainmententertainment newsmarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shashank Ketkar Anniversary

"प्रचंड त्रास देणाऱ्या…", शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, बायकोचं केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला, "चिडक्या, भांडणाऱ्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.