गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रचंड त्रास देणाऱ्या…”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, बायकोचं केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला, “चिडक्या, भांडणाऱ्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2023 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar Anniversary

"प्रचंड त्रास देणाऱ्या…", शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, बायकोचं केलं तोंडभरुन कौतुक, म्हणाला, "चिडक्या, भांडणाऱ्या…"

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकच्या या मालिकेतली श्री या भूमिकेला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर शशांकने बऱ्याच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली. शशांक अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. (Shashank Ketkar Anniversary)

शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. पुण्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता हे कपल पालकत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहेत. व्यवसायाने वकील असलेली प्रियांका व अभिनेता शशांक लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने पत्नीसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. शशांकने ही खास पोस्ट शेअर करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “तिने सुशांतला मिठी मारली अन्…”, विकी जैनशी लग्न होऊनही सुशांत सिंह राजपूतला विसरु शकली नाही अंकिता लोखंडे, म्हणाली, “खूप राग यायचा कारण…”

शशांकने पोस्ट शेअर करत लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा. आज मी जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळे. तू माझ्यातील चिडक्या, भावुक, भांडणाऱ्या, व्यवहारी, अत्यंत तत्त्वनिष्ठ, कधी कधी खूप विचित्र वागणाऱ्या, कधी कधी प्रचंड त्रास देणाऱ्या, मस्ती करणाऱ्या शशांकला कायम सांभाळून घेतेस. म्हणूनच म्हणतोय तू आहेस म्हणून मी आहे” असं म्हणत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत, “आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजून खूप सारी स्वप्नं एकत्र बघू आणि पूर्णही करू” असंही त्याने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

आणखी वाचा – हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, “ताईची…”

त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शशांक सध्या ‘मुरंबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. शशांक व त्याची पत्नी प्रियांका यांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. यावेळी झालेल्या ओळखीचं रूपांतर कालांतराने मैत्रीत झालं आणि दोघांनी ४ डिसेंबर २०१७ साली लगीनगाठ बांधली. पेशाने वकील असलेली प्रियांका उत्तम नृत्यांगना देखील आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialpriyanka dhavaleshashank ketkarshashank ketkar anniversaryshashank ketkar on wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Vishakha Subhedar On Kurrr

“मज्जाच गेली आता…”, नम्रता-प्रसाद नाटकातून बाहेर पडल्यानंतर विशाखा सुभेदारला नेटकऱ्यांनी सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “जागेवर बसण्यापेक्षा ”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.