‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धा हिने तिच्या आवाजाच्या जादूने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मुग्धाच्या गायनाचे अनेक चाहते दिवाने आहेत. मुग्धाने तिच्या गायनाच्या कलेने प्रत्येकाचं मन जिंकलं. काही महिन्यांपूर्वीच मुग्धाने प्रेक्षकांसह एक आनंदाची बातमी शेअर केली होती. मुग्धाने लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटेसह नात्यात असल्याची कबुली देत तिने ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर केला होता. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)
मुग्धाने नात्याची कबुली दिल्यानंतर तिच्या केळवणाचे अनेक फोटोस, व्हिडीओस सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यादरम्यान मुग्धाने शेअर केलेल्या फोटोवरून आणखी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुग्धापाठोपाठ तिच्या मोठ्या बहिणीचंही लग्न ठरलं आहे. मुग्धाच्या बहिणीचं लवकरचं लग्न होणार आहे. सध्या तिच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.
मुग्धाची मोठी बहीण मृदुल हिची लगीनघाई सुरु झाली आहे. काल प्रथमेश लघाटेने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला होता. तर आज मुग्धाच्या बहिणीची हळद असलेली पाहायला मिळत आहे. मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून ताईच्या हळदीनिमित्त खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुग्धा व तिची बहीण पाहायला मिळत आहे. दोघींना हळद लागलेली असून ‘ताईची हळद’ असं कॅप्शन देत मुग्धाने हा फोटो शेअर केला आहे.
मुग्धाच्या केळवणाबरोबर तिच्या बहिणीचंही केळवण करण्यात आलं होतं. मुग्धासह तिची मोठी बहीण बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसते. मुग्धाच्या मोठ्या बहिणीची लगीनघाई पाहता आता मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहते वाट पाहत आहेत. अद्याप तरी त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितलेली नाही. त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.