शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाआधी माझं एक अफेअर होतं आणि…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आंतरजातीय विवाहामुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chala Hawa Yeu Dya fame Ankur Wadhave shared his marriage story see the details

"लग्नाआधी माझं एक अफेअर होतं आणि...", 'चला हवा येऊ द्या' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "आंतरजातीय विवाहामुळे..."

झी मराठी वहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या ना?’ या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या शोची व या शोमधील कलाकारांची चर्चा ही नेहमीच होताना दिसते. या शोमधून कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडेसारख्या अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यात काही वेळाने नव्याने सहभागी झालेला सदस्य म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय व मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

२८ जून २०१९ रोजी अंकुरचा विवाह पार पडला होता. लग्नाचे काही खास फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची माहिती दिली होती. मात्र अंकुरच्या या लग्नाचा एक वेगळाच किस्सा आहे. स्वत: अभिनेत्याने याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले आहे. वीणा जगतापला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. यावेळी वीणाने अंकुरला “तुझ्या आयुष्यात वहिनींची एंट्री कशी झाली?” असा प्रश्न विचारला.

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_vitthalrao_wadhave)

या प्रश्नाचे उत्तर देत अंकुरने असं म्हटलं की, “ती माझ्या सख्ख्या मामाची मुलगी आहे आणि आमचं पूर्णत: अरेंज मॅरेज आहे. म्हणजे आमचं इतकं अरेंज मॅरेज आहे की, मी पाहण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा गेलो नव्हतो. लग्नाआधी माझं एक अफेअर होतं आणि हे अफेअर दीड वर्षांचं होतं. या दीड वर्षांत आम्ही फक्त तीनदा भेटलो होतो. एकदा थिएटरमध्ये, दुसऱ्यांदा मंदीरात आणि तिसऱ्या वेळेस मी थेट तिला घरी घेऊन गेलो.”

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडणार गौरव मोरे?, हिंदी शोमध्ये अभिनेत्याची दमदार एन्ट्री, प्रेक्षक म्हणाले, “भाऊ तुम्ही हास्यजत्रा…”

यापुढे त्याने असं म्हटल की, “तिला घरी घेऊन गेल्यानंतर आईने आम्हाला “आम्ही लग्न करणार आहोत का?” असा प्रश्न विचारला. मात्र आंतरजातीमुळे तिने लग्न करण्याला नकार दिला. कारण ती घरातली मोठी मुलगी होती आणि बाबांना हे कळलं तर त्यांना अटॅक येईल असं ती म्हणाली. मग ती गेल्यावर माझ्या आईने आम्हाला आमचे रिलेशन थांबवण्याचा सल्ला दिला. मग काही दिवसांनी माझ्या एका जिवलग मित्राने प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्या केली आणि यामुळे माझ्या आईने माझ्या लग्नाचा विचार केला.”

आणखी वाचा – महेश मांजरेकर झाले गायक, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये गायलेलं गाणं प्रदर्शित, व्हिडीओ पाहून चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

यापुढे त्याने म्हटलं की, “लग्न करताना मी एक अट घातली की, मी जसा आहे तसा स्वीकार करणारी मुलगी असेल तरच मी लग्न करेन. मग आम्ही माझ्या वाहिनीच्या सल्ल्याने व्हिडीओ कॉल केला आणि या कॉलवर मी तिला माझ्या सगळ्या सवयींबद्दल सांगितले. जर हा असेल तर आत्ताच हो बोल नसेल तर नाही. तुला कुणी काही बोलणार नाही आणि जर हे तूला जमात नसेल तर तुझ्यावतीने मी बोलतो. पण तसं काही नव्हतं आणि मग आमचं लग्न झालं.”              

Tags: Ankur Wadhavechala hawa yeu dyamarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update

पारूच्या जीवाला होणाऱ्या नवऱ्यापासून धोका, दिशा व दामिनीचा डाव होणार का सफल?, मालिकेत नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.