झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. त्यातील एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. विनोदाचं अचूक टायमिंग, अभिनय यामुळे त्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. दहा वर्षांनी ‘चला हवा…’ या कार्यक्रमाने निरोप घेतला. त्यानंतर तो आता सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमामध्येही तो प्रेक्षकांचा खळखळवून हसवत आहे. तो टेलिव्हिजनबरोबरच सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (kushal badrike instagram post)
कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास हा खूपच खडतर होता. ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’ अशा अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यावेळी त्याची बायको सुनयनाने त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये खूप साथ दिली होती. तो प्रत्येक मुलाखतीमध्ये तिचे नाव घेऊन कौतुक करत असतो. अशातच त्याने आता बायकोसाठी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याने त्याचा व बायकोचा फोटो शेअर केला असून त्यावरील कॅप्शनची चर्चा सर्वत्र होत आहे.
कुशलने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात खूप साऱ्या बॅग असलेल्या दिसत आहेत. त्याची पत्नी पुढे चालत आहे आणि कुशल तीच्या मागे चालत आहे. सुनयनाच्या हातामध्ये कोणतीही बॅग पाहायला मिळत नाही आहे. यावरुन त्याने या फोटोला एक हटके कॅप्शन दिले आहे. ज्यामुळे या फोटोवर कुशलच्या अनेक चाहत्यांनी अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोला “मागे भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हीने एकटीनेच उचलला आहे म्हणून”, असे कॅप्शन दिले आहे.
त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच एक नेटकरी म्हणाला की, “नवरा पण भारी देवा”, दुसरा नेटकरी लिहितो की, “घरातील विषय सार्वजनिक करु नका दादा…गरम पोळ्या बंद होतील ना तुमच्या”, तसेच अजून एक नेटकरी लिहितो की, “याला म्हणतात सर्वगुण संपन्न नवरा”.
दरम्यान कुशलच्या कामबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रांमध्ये काम करत आहे. तसेच त्याची पत्नी सुनयना ही कथ्थक डान्सर आहे.