रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शमिता शेट्टीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले Egg Freeze, सहन करावा लागला भयानक त्रास, म्हणाली, “खूप इंजेक्शन आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 18, 2024 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ridhima Pandit on Egg Freezing

शमिता शेट्टीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले Egg Freeze, सहन करावा लागला भयानक त्रास, म्हणाली, "खूप इंजेक्शन आणि..."

‘रोबोट बहू’ या नावाने ओळखली जाणारी टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री रिद्धिमा पंडित खूपच लोकप्रिय ठरली. ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेमधून रिद्धिमा पंडित हिला बरीच ओळख मिळाली. आजही लोक तिच्या व्यक्तिरेखेचे ​​आणि अभिनयाचे कौतुक करताना दिसतात. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने केलेलं हे भाष्य चर्चेत आलं आहे. तिने आपली बीजांडे गोठवण्याचा (Eggs Freeze) करण्याचा अनुभव शेअर केला आहे. (Ridhima Pandit on Egg Freezing)

मातृत्व आणि Eggs Freeze बद्दल बोलताना रिद्धिमा म्हणाली, “माझ्यासाठी मातृत्व महत्त्वाचे आहे. परंतु बऱ्याच लोकांसाठी ही एकमेव गोष्ट नाही. आणि मला सुद्धा ती एकच गोष्ट महत्त्वाचीही बनवायची नव्हती, कारण मी ३० वर्षांचीही नव्हते. त्यामुळे मला संधी घ्यायची नव्हती. स्त्रीचे जैविक घडण ही दररोज बदलत असते. आपण भरपूर eggs घेऊन जन्माला येतो आणि काही काळानंतर ते कमी होतं जातात. त्यामुळे मला या गोष्टींची माहिती होती.

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला मुलाला जन्म, सुप्रसिद्ध गायक भेटायला जाताच म्हणाला, “आता कुटुंबाला…”

View this post on Instagram

A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

रिद्धिमा पुढे म्हणाली, “हे फार सोपे नाही. भरपूर इंजेक्शन्स घ्यावी लागतात. शरीर खूप फुगलेलं असतं. वजन वाढते, हे चिंताजनक नाही. फुगलेले शरीर हळूहळू कमी होतं जातं. हार्मोनल इंजेक्शन्समुळे तुम्ही जाड व्हाल असा समज नाही. याशिवाय लग्नाच्या प्लॅन्सवर रिद्धिमा पंडित म्हणाली, “मला माहित नाही की, भविष्यात लग्न होईल की नाही. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मला योग्य जोडीदार मिळेल. हे शक्य आहे की भविष्यात मी एकट्याने बाळाची योजना करु शकते. निदान मी तणावमुक्त आहे. जैविकदृष्ट्या मी माझे काम केले आहे”.

आणखी वाचा – “माझ्या दारुच्या व्यसनामुळे…”, पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, “आमचं नातं…”

प्रजननक्षमता संरक्षण हे एक विस्तृत क्षेत्र आहे. करिअर किंवा अन्य प्राधान्य द्यायच्या गोष्टी डोळ्यासमोर असताना तुम्हाला बाळंतपण पुढे ढकलण्यासाठी बीजांडे फ्रीझ करण्याचा पर्याय मदत करु शकतो. रिद्धिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आजवर तिच्या अभिनयाने मालिकाविश्वातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय ती ‘बिग बॉस ओटीटी’, ‘खतरों के खिलाडी ९’ सारखे शो देखील केले आहेत.

Tags: entertainmentridhima panditRidhima Pandit on Egg Freezingtv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sairat fame actress Rinku Rajguru shared a video from Arijit Singh's live concert

Video : अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टमध्ये गेली रिंकू राजगुरु, गाणी ऐकून कार्यक्रमातच उड्या मारु लागली अन्…; म्हणाली, "खूपच भारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.