रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या नावाचा वापर करुन…”, राखी सावंतला पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने केलेलं दुसरं लग्न बघवेना, म्हणाली, “माझ्यामुळे तुझ्या नावाच्या…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 18, 2024 | 4:10 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Rakhi Sawant reacted to Adil Khan's allegations see the details

"माझ्या नावाचा वापर करुन...", राखी सावंतला पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने केलेलं दुसरं लग्न बघवेना, म्हणाली, "माझ्यामुळे तुझ्या नावाच्या..."

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान या दोघांच्या अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत. आदिल खानने नुकतेच ३ मार्च रोजी ‘बिग बॉस’ फेम सोमी खानबरोबर गुपचूप लग्न केले, त्यानंतर या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या लग्नाके काही फोटो शेअर करत साऱ्यांनाच धक्का दिला. त्याच्या या लग्नाने राखीलाही धक्का बसला. आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे वृत्त कळले तेव्हा ती राखी दुबईत होती.

आदिलच्या सोमीबरोबरच्या लग्नावर राखीने तिची प्रतिक्रिया देताना आदिलचे माझ्याशी लग्न होण्याआधीही ५-६ लग्न झाले होते. माझ्याबरोबर जसा अत्याचार केला तसंच तो सोमीबरोबरही करणार आहे. त्यामुळे तिला कोणीतरी वाचवा असे अनेक आरोप केले होते. तसेच आदिलने घटस्फोट घेतला नसल्याचेही तिने सांगितले होते. यावर आदिलनेही राखीला कोरोना विषाणू म्हणत तिने दुबईतच राहावे. इथे भारतात, मुंबईत येऊ नये. तिच्यामुळे इथे सगळे सुरक्षित आहेत असं म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, म्हणाला, “तू नेहमीच मला…”

आता यावर राखीने पुन्हा आदिलला प्रत्युत्तर दिलं आहे. राखीचा एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने आदिलवर राग व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तू दुसरे लग्न केले. तू मीडियात घाण पसरवत आहेस. तू खूप प्रसिद्ध आहेस असे तुला वाटते का? किती दिवस राखी सावंतच्या नावाचा वापर करणार? माझ्यामुळे तुझ्या नावाच्या बातम्या होतात आणि त्यामुळेच तू चर्चेत राहतोस. थांब, मी लवकरच भारतात येत आहे.”

आणखी वाचा – Video : आधी मराठी गाण्यांवर डान्स आता किली पॉलने गायलं ‘गुलाबी साडी’ गाणं, मराठी ऐकून सगळेच भारावले, म्हणाले, “तुझं आधार कार्ड…”

दरम्यान, आदिलने राखीविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे ती दुबईत राहत असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल “मी दाखल केलेल्या तक्रारीमुळे तिला जामीन मिळत नाही आहे. ती ४-५ महिन्यांपासून पळून जात आहे. त्यामुळे ती सध्या दुबईत आहे. कारण ती इथे येताच तिला अटक करण्यात येईल” असा आरोप आदिलने केला आहे.

Tags: Adil KhanEntertainment News Bollywood Entertainment Newsrakhi sawant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Ridhima Pandit on Egg Freezing

शमिता शेट्टीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले Egg Freeze, सहन करावा लागला भयानक त्रास, म्हणाली, "खूप इंजेक्शन आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.