सध्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. सगळ्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अधिक चर्चा रंगली ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीची. पंतप्रधान मोदी हे नवदांपत्याला आशिर्वाद देण्यासाठी मुंबई येथे आले होते. त्यांनी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. आशातच आता पंतप्रधान मोदी व अंबानींची थोरली सून श्लोका मेहता यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (shloka mehta seeping)
अनंत व राधिकाच्या लग्नातील अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये श्लोका ही पंतप्रधान मोदी यांच्या बाजूला बसलेली आहे. यावेळी ती झोपताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी श्लोकाची बाजू घेत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये श्लोका, आकाश अंबानी, ईशा अंबानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच लाइनमध्ये बसले होते. या ठिकाणी श्लोला पंतप्रधानांच्या बाजूला बसून डुलकया घेताना दिसत आहे. लग्नाचे विधी सुरु असताना श्लोका झोपेतून जागे राहण्याचा जो संघर्ष करत आहे तो स्पष्टपणे दिसून येत आहे.
Shloka Mehta Ambani, who was sitting beside Akash Ambani and PM Narendra Modi, falls asleep during the #ShubhAashirvaad ceremony of Anant Ambani and Radhika Merchant. #AnantAmbani #AnantRadhikaReception pic.twitter.com/4fgnHk94Ls
— CineScoop (@Cinescoop7) July 14, 2024
या व्हिडीओला नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी श्लोकाबद्दल सहानभूतीही दाखवली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “एक माणूस म्हणून ती झोपू शकते”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिकिया दिली की, “मला माझ्याच लग्नात झोप येत होती, सकाळपासून काही खायला नाही, काही दिवसापासून झोप नाही. भारतीय लग्न हे जोडप्यांसाठी व कुटुंबासाठी खूप थकवा आणणारी असतात”, तसेच अजून एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “झोप येणं हा काही गुन्हा नाही”.
अंबानी यांनी अनंत व राधिका यांच्या लग्नासाठी जगभरातील सगळ्या मोठ्या व्यक्ती हजर होत्या. हे लग्न या शतकातील सगळ्यात महागडे लग्न म्हंटले जात आहे. या लग्नासाठी तब्बल ५००० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.