गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुशल बद्रिकेच्या बायकोने बेडरुमभर वाळत घातले कपडे, मोठं घर घेतल्यानंतर अभिनेत्याने दाखवली परिस्थिती, म्हणाला, “वॉशिंग मशिनला…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike post caught everyone's attention for his caption know more

कुशल बद्रिकेच्या बायकोने बेडरुमभर वाळत घातले कपडे, मोठं घर घेतल्यानंतर अभिनेत्याने दाखवली परिस्थिती, म्हणाला, "वॉशिंग मशिनला..."

‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. या फोटो किंवा व्हिडीओखखालील कुशलचे कॅप्शन्सही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.

कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मित्र-मैत्रिणीचे नाते असल्याचे कायमचं पाहायला मिळाले आहे आणि हे खास नाते त्यांच्या अनेक फोटो किंवा व्हिडीओमधून पाहायला मिळतं. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या घरात सगळीकडे अस्ताव्यस्त कपडे पडलेले दिसत आहेत आणि या अस्ताव्यस्त कपड्यांमध्ये कुशल उभा आहे. या फोटोखाली लिहिलेल्या हटके कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – Video : अंबानींनाही पडली पारंपरिक कोळीगीतांची भुरळ, रिसेप्शन सोहळ्यात घुमले मराठमोळे सुर, व्हिडीओ व्हायरल

या फोटोखाली कुशलने असं म्हटलं आहे की, “आपलं स्वतःचं घर झालं की, त्यातली एक खोली आपण ‘कलेसाठी’ समर्पित करायची, जिथे ‘कलेची’ जोपासना झाली पाहिजे. हे आमच्या दोघांचंही स्वप्न होतं आणि आज एका छोट्याश्या डिस्कशननंतर माझ्या बायकोने मला पटवून दिलं की.  पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक ‘कलाच’ आहे. आम्ही प्रेमाने घेतलेल्या घराच्या ‘खोलीचा’ पुरेपूर वापर झाल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर आहे”.

आणखी वाचा – Video : तू चाल पुढं! कॅन्सरशी झुंज देता देता हिना खानची कामाला सुरुवात, व्हिडीओद्वारे दाखवली स्वत:ची अवस्था, म्हणाली, “चांगल्या दिवसांची वाट…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अजूनही माझ्या प्रेमात किती ‘खोली’ आहे हे मी हिला (पत्नीला) दाखवलं असतं. पण जाऊदे. पावसाळा आहे आणि वॉशिंग मशीनला कपड्यांचा एक लॉट अजून लावलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पावसाळ्यात अन्न, वस्त्र आणि वारा होऊन बसतात. असा नवीन शोध आज मला लागला”. यापुढे त्याने एक खास तळटीपही लिहिली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “आमच्या त्या छोट्याश्या सांभाषणानंतर माझ्या असं लक्षात आलं की, कथ्थक नाचणाऱ्या मुलींचा पाया आणि पाय दोन्ही खूप मजबूत असतात. आता माझी कंबर बरी आहे काळजी नसावी”.

Tags: kushal badrikemarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Sanskruti Balgude Hair Donate

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कापले स्वतःचे केस, लूकचाही केला नाही विचार, म्हणाली, "मनात कुठेतरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.