अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे १२ जुलै २०२४ रोजी लग्न झाले. यानंतर अंबानी कुटुंबाने नवविवाहित जोडप्यासाठी शुभ आशीर्वाद आणि मंगल उत्सवसारखे कार्यक्रम आयोजित केले होते. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे दुसरे रिसेप्शन काल १५ जुलै २०२४ रोजी झाले. या कार्यक्रमात संपूर्ण अंबानी कुटुंबाने आपल्या स्वागत भाषणाने सर्वांची मने जिंकली. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांचा लहान नातू पृथ्वीने असे काही केले की, सर्वांची मनं जिंकली.
नीता अंबानी यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पाहुण्यांना अभिमानाने ओळख करुन दिली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करून दिल्यानंतर नीता अंबानींनी त्यांचा नातू पृथ्वीचे मंचावर स्वागत केले. पृथ्वी हा मुकेश व नीता अंबानी यांचा मोठा नातू आहे. यावेळी आकाश अंबानी व श्लोका मेहता यांचा मुलगा पृथ्वी निळा कुर्ता आणि पांढऱ्या पायजमामध्ये खूपच क्यूट दिसत होता. मंचावर उपस्थित असलेल्या आजी नीता यांनी पृथ्वीचे नाव पुकारताच तो स्टेजच्या दिशेने धावत आला आणि वाटेत धडपडला.
आणखी वाचा – Video : अंबानींनाही पडली पारंपरिक कोळीगीतांची भुरळ, रिसेप्शन सोहळ्यात घुमले मराठमोळे सुर, व्हिडीओ व्हायरल
मग आजी त्याला उचलत त्याच्याकडे माइक देते. नंतर तो ‘नमस्ते’ म्हणत पाहुण्यांचे स्वागत करतो आणि ‘जय श्री कृष्ण’ म्हणत निघून जातो. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पृथ्वीने आपल्या गोंडस कृतीने इंटरनेटवर सर्वांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेकजण लहानग्या पृथ्वीच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. नेटकरी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
“काहीही असो, अंबानी कुटुंबात सनातनी संस्कृती दिसून येते”, “अंबानी कुटुंब खरोखरच त्यांच्या मुलांचे संगोपन खूप चांगले करत आहे”, “मुलाने जय श्री कृष्ण कोणीही न बोलता म्हटले, माणूस केवळ पैशाने नाही तर संस्कारांनी मोठा होतो हे मला आवडले” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अनंत आणि राधिकाच्या लग्नात देशभरातील आणि जगभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अनंत-राधिकाच्या शाही विवाहानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशीर्वाद सोहळ्याला पोहोचून वधू-वरांना आशीर्वाद दिले.