Paaru Serial Actress Shrutkirti Sawant: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. दरम्यान २०२५ हे वर्ष संपताना आणि २०२६ हे वर्ष सुरु होताना अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर अनुभव शेअर केले. कलाकारांच्या आयुष्यात २०२५ मध्ये कोणत्या चान्गल्या गोष्टी घडल्या, २०२५ या वर्षातून त्यांना नेमकं काय शिकता आलं हे सगळं कलाकारांनी पोस्टद्वारे सांगितलं. अशातच ‘पारू’ या मालिकेतील दामिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंत हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रुतकिर्ती सावंतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “इतक्या उशिरा नवीन वर्षाचं सेलिब्रेशन का होतं आहे?, असा प्रश्न तुम्हा सगळ्यांनाही पडला असेल. खरं सांगायचं तर, नवीन वर्ष सुरू झालं ही गोष्ट मी स्वीकारलीच नाही. २०२५ हे वर्ष आपल्या आयुष्यातून खूप वेगाने निघून गेलं आणि २०२६ आपल्या आयुष्यात तितक्याच वेगाने आलं. हे सगळं समजून घ्यायला मला थोडा वेळ लागला. ही गोष्ट लवकर समजलीच नाही. पण तरीसुद्धा, २०२५ मध्ये मी जे काही शिकले,जे काही अनुभव घेतले, त्यातून पुढे जाण्याचा मी प्रयत्न करते. २०२५ या वर्षाने मला खूप गोड आठवणी दिल्या, तसेच काही वाईट अनुभवही दिले. या दोन्हींच्या मिश्रणातून जे काही अनुभव, भावना आणि शिकवण तयार झाली, ती मी एक माणूस म्हणून साठवून ठेवलं आहे , आणि त्यातून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करते.” (Paaru Serial Actress Shrutkirti Sawant)
पुढे तिने लिहिलं, “मी ठरवलं आहे की नकारात्मक विचार, नकारात्मक लोक आणि नकारात्मक ऊर्जा यांच्यापासून दूर राहायचं. मला माझं आयुष्य शांततेत आणि समाधानात जगायचं आहे. २०२५ पर्यंत गेलेली सगळी वर्षं यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. या वर्षांनी मला खूप सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि त्याबद्दल मी कायम आभारी राहीन. आता २०२६ मध्ये मला खूप काम करायचं आहे, आनंदी राहायचं आहे आणि काहीतरी नवीन शिकायचं आहे. माणूस म्हणून जगायचं आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. खूप धन्यवाद. असं लिहीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. (Paaru Serial Actress Shrutkirti Sawant)



