सध्या सर्वत्र एका चित्रपटाची हवा आहे ती म्हणजे ‘बॉईज ४’. ‘बॉईज’ चित्रपटाच्या तीनही भागांनी आजवर साऱ्या तरुणाईच्या दिलाचा ठेका घेतला. तरुणाईला भुरळ घातलेल्या या चित्रपटाचा आता पुढील भाग ‘बॉईज ४’मधून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. सारे प्रेक्षक वर्ग ‘बॉईज ४’ची आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता अधिक काळ ताणली जाणार नसून लवकरच त्यांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवायला चितंत्रपटच टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (Boys 4 Teaser Release)
विशाल सखाराम देवरुखकर यांच्या ‘बॉईज’ फ्रॅन्चायझीमधील चौथा भाग ‘बॉईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, ऋतुजा शिंदे, जुई बेंडखळे यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार गौरव मोरे व निखिल बने देखील झळकणार आहेत.काही दिवसांपूर्वी चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये हे सर्व कलाकार दिसत आहेत. त्याच्या पाठोपाठ आता चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉईज ४ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या टीझरमध्ये असं पाहायला मिळतंय की, मित्रांची धमाल, मस्ती, एकमेकांच्या विरोधात गेलेल्या मित्रांना शिकवण्यात आलेला धडा हे सगळं काही पाहायला मिळालं. “भावांनो, मैत्री करण्यासाठी नाय तर निभावण्यासाठी लागतो जिगर!” असं कॅप्शन असलेला टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या टीझरमध्ये पार्थ भालेराव, निखिल बने, गौरव मोरे पाहायला मिळाले, मात्र चित्रपटात ओंकार भोजने आहे पण त्याची झलक चित्रपटाच्या टीझरमध्ये न दिसल्याने साऱ्यांनी गौरव मोरेने पोस्ट केलेल्या टीझरच्या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.

अनेकांनी कमेंट करत टिझर दमदार असल्याचं म्हटलं आहे, तर का युजरने ‘ओंकार भोजने कुठे आहे?’ अशी कमेंट केली आहे. शिवाय अनेकांनी ओंकारला मिस करत, असल्याचंही म्हटलं आहे. चित्रपटात ओंकारची सस्पेन्स एंट्री असणार का याकडे आता साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.