शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 22, 2023 | 6:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar big Statement

“काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि...”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण...”

आपला अभिनय व नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक नाव हमखास घेतलं जातं, ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृताने छोट्या पडद्यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अमृताला अभिनेत्री म्हणून ओळखलं जात असलं. त्याचबरोबर ती उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याने अमृताची जगभरात ओळख मिळाली आहे. (Amruta Khanvilkar big Statement)

लावणी नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी अमृता कथक नृत्याची प्रचंड चाहती असून काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गणराया गजानन’ गाण्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकतंच हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याच्या प्रमोशन निमित्ताने अमृता सध्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर विविध माध्यमांना मुलाखत देते. नुकतंच अमृताने एक मुलाखत दिली असून ज्यात तिने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.

हे देखील वाचा – “लोक अनेकदा…”, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये वयाने मोठे दिसणाऱ्यावरुन अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान ट्रोल, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आमचं वय…”

‘मिर्ची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय प्रमोशन करण्यासाठी विविध कार्यक्रमामध्ये जात असताना कलाकारांची केली जाणारी थट्टा तिला आवडत नसल्याचं अमृताने सांगितलं. याबाबत अमृता म्हणाली, “माणूस आहे त्याला त्याचा आदर द्या. असं म्हणत नाही की, खूप मोठं काम मी माझ्या आयुष्यामध्ये केलं आहे. पण माणूस म्हणून एकमेकांचा आदर केला पाहिजे”.

हे देखील वाचा – ५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

“आम्ही प्रमोशनसाठी वगैरे बऱ्याचदा जातो. काही शोमध्ये सतत कलाकारांची खेचली जाते. ते मला आवडत नाही. असं करु नका मला अजिबात हा प्रकार आवडत नाही. आपल्या मराठीमध्ये हा प्रकार खूप घडतो. मजेसाठी कलाकारांची इतकी खेचली जाते की, डोक्यात जायला लागतं. मला हा प्रकार आवडत नाही कारण मी स्वतः कोणाशी असं कधीच वागत नाही. मी कोणाला काही वेगळ्याप्रकारे बोलतही नाही. समोरच्या माणसाला वाईट वाटेल असं बोलणं मी टाळते”. अमृताने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या.

Tags: amruta khanvilkarAmruta Khanvilkar big Statementganaraya gajanan song
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Jo Jonas On Sophie Turner

प्रियांका चोप्राच्या जाऊबाईने पतीवर केले गंभीर आरोप, जो जोनासने सोडलं मौन, म्हणाला, "अपहरण हे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.