देशभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे. काल अनेकांच्या घरी बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी कलाकारांप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. शिल्पा शेट्टी, सलमान खान यांसारख्या बॉलिवूड कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झालेला असताना किंग खान शाहरुख खानच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे आगमन झाले आहे. शाहरुखने सोशल मीडियावर बाप्पाची एक झलक त्याच्या चाहत्यांसमोर शेअर केली आहे. (Shahrukh Khan welcome Lord Ganesha)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यंदाचा गणेशोत्सव अभिनेत्यासाठी खूप खास आहे. कारण यंदाचे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहे.
हे देखील वाचा – Video : रितेश देशमुखने मुलांसह बनवला टाकाऊ वस्तूंपासून गणपती, अभिनेत्याच्या लेकांनी म्हंटली आरती, व्हिडीओ पाहून होतंय कौतुक
अशातच ‘जवान’ फेम अभिनेत्याच्या घरी यंदा गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. शाहरुखच्या घरच्या बाप्पाची एक झलक त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या फोटोसोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख या पोस्टमध्ये म्हणतो, “गणपती बाप्पाचे घरी स्वागत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी आशीर्वाद देवो !”
हे देखील वाचा – “त्या एकमेव व्यक्तीशी मी तासन् तास बोलायचो”, अशोक सराफ यांनी केला होता खुलासा, म्हणालेले, “कायम मनात…”
शाहरुखची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनेत्याला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता शाहरुख खान दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरे करतो.