‘आमचं ठरलं’ हा हॅशटॅग सध्या कलाकार मंडळींमध्ये अधिक प्रमाणात वायरल होतोय. काही दिवसांपूर्वीच आमचं ठरलं असं म्हणत गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या अफेअरची ऑफिशिअल घोषणा केली. दोघांनी एकत्र एक फोटो स्टोरी पोस्ट करत ही आनंदाची गोड बातमी झाली. शिवाय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांनी देखील आमचं ठरलं म्हणत गुडन्यूज दिली. तसेच अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांनीही गुपचूप साखरपुडा सोहळा उरकला. ता यानंतर सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. (Sharayu Sonawane Engaged)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत पिंकी ही मुख्य भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत होती. मात्र शरयूने ही मालिका अर्ध्यावरून सोडली, त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनंतर चाहते शरयूला मिस करत होते. त्यानंतर आता शरयूने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
अभिनेत्री शरयू सोनावणे हिने गुपचूप साखरपुडा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. थेट साखरपुडा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत तिने साखरपुडा सोहळा उरकला असल्याची माहिती देऊन तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शरयूने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर केले असून तिने पोस्टखाली दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे. शरयूने म्हटलं आहे की, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.”
शरयूने निर्माता जयंत लाडेसह साखरपुडा सोहळा उरकला. जयंतने ‘सूर सपाटा’,‘अ पेईंग गेस्ट’ या चित्रपटांसाठी काम केलं आहे. शरयूने अचानक दिलेली ही गुडन्यूज चाहत्यांना सुखद धक्का देणारी ठरली. शरयूच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अअभिनेत्री समृद्धी केळकर, गिरीजा प्रभू, कोमल कुंभार यांसारख्या अनेक कळकरांनी शरयूला शुभेच्छा दिल्या आहेत.