बॉलिवूड गायिका नेहा कक्कर ही नेहमी चर्चेत असते. आजवर नेहाने अनेक हिंदी व पंजाबी गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळते. काही वर्षांपूर्वी ती गायक रोहनप्रीत सिंहसह लग्नबंधनात अडकली. ती नेहमी नवऱ्याबरोबरचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेयर करत असते. त्यांच्या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत असते. अशातच आता दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येत असून चाहत्यांनीदेखील प्रेमाचा वर्षाव केला आहे. (neha kakkar private video viral)
नेहा व रोहनप्रीत यांच्या जोडीला खूप पसंत केले जाते. अनेकदा त्यांचा बाहेर फिरतानाचे देखील व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. मात्र त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये नेहाच्या खासगी व्हिडीओबद्दल नेटकरी चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नेहा व रोहनप्रीत एकत्रित वेळ घालवताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ नेहाने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमॅंटिक झालेले दिसून येत आहेत. नेहाने रोहनप्रीतच्या मांडीवर डोकं ठेवलं असून रोहनप्रीत शॅम्पेन पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेहाने लिहिले की, “माझी सुरक्षित जागा”. तसेच हा व्हिडीओ तिने रोहनप्रीतला टॅगदेखील केला आहे. या व्हिडीओवर रोहनप्रीतने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “मी नेहमी तुझ्याबरोबर असेन”. या व्हिडीओवर अनेकांनी पसंती दर्शवली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी नेहा व रोहनप्रीतला ट्रोल करण्यासदेखील सुरुवात केली. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे कीती बकवास आहे आहे. तुम्ही गायक आहात तर गाण्याचे व्हिडीओ शेयर करा. हे सगळं काय आहे?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “थोडीतरी लाज बाळगा”. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. दोघंही २०२० साली लग्नबंधनात अडकले होते.