देशात सर्वत्र कोलकता येथे सरकारी रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्येचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावर देशातील जनतेने या सर्व प्रकारांवर निषेध नोंदवला आहे. मनोरंजन विश्व तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे देशातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. हृतिक रोशन, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, करीना कपूर या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्येच आता अभिनेता नील नितीन मुकेशने बलात्कार प्रकरणावर आपले मत व्यक्त केले असून चिंता व्यक्त केली आहे. (neil nitin mukesh on kolkata rape case)
नील नेहमी संवेदनशील विषयांवर आपले मत मांडत असतो. नुकताच त्याने ‘बुजोका’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने कोलकातामध्ये भयानक दुर्घटनेसंदर्भात भाष्य केले आहे. जेव्हा या घटणेबद्दल त्याने पहिल्यांदा ऐकले तेव्हा तो मुलगी व बायकोबरोबर सासरी गेला होता. तसेच ही घटना ऐकताच तो एका तासापेक्षा अधिक काळ रडत होता. नीलने सांगितले की, “जेव्हा मी या घटनेबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझी पत्नी व मुलगी तिच्या आईच्या घरी गेली होती. मी घरी एकटाच होतो. जशी मी ही बातमी ऐकली तेव्हा मी रडायला लागलो. मी एक तास शांतच बसून होतो. त्याचक्षणी मी माझ्या पत्नीलं कॉल केला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला”.
पुढे तो म्हणाला की, “मी खूप भावनिक व्यक्ती आहे. मी प्रत्येक बापासारखाच एक माझ्या मुलीचा विचार करतो. मुलीबरोबर अनेक रील्स करुन शेयर करतो. आता मी माझ्या मुलीच्या भविष्याबद्दल विचार करतो तेव्हा विचार करतो की ती मोठी होऊन काय करेल? पण आता जे घडलं आहे विचार करून मला खूप भीती वाटत आहे”.
नीलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, २०१७ साली त्याने रुक्मिणी सहायबरोबर लग्न केले. त्यानंतर २०१८ साली त्यांना मुलगी झाली तिचे नाव नुरवी असे ठेवले. तो नेहमी पत्नी व मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेयर करताना दिसतो.