‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या शोने जगभरातील प्रेक्षकांना वेड केलं आहे. या शोमधील प्प्र्त्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत सोडण्यापर्यंत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी अब्दुलच्या जाण्याच्या अटकळींनाही जोर आला. पण ते खरंच या शोमधून जात आहेत की नाही यामागचं सत्य अभिनेता शरद सांकला यांनी सांगितलं आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अब्दुलची भूमिका अभिनेता शरद सांकला साकारत आहे. नुकताच तो शो सोडत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आता ते या शोमध्ये दिसणार नाहीत अशा चर्चा पाहायला मिळाल्या. पण ‘इटाईम्स’शी विशेष संवाद साधताना अभिनेत्याने या अफवांचे खंडन केले. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sharad Sankla statement)
शो सोडण्याचा आपला कोणताही विचार नसल्याची ग्वाहीही त्याने दिली. एवढेच नाही तर शो प्रसारित होईपर्यंत तो TMKOC सोबतच राहणार असल्याचेही त्याने सांगितले.शोमधून बाहेर पडण्याच्या अफवांबाबत शरद सांकला म्हणाले की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. तो या शोच्या कथेचा एक भाग आहे आणि लवकरच गोकुळधाम सोसायटीत परतणार आहे यावर त्याने भर दिला. अफवांबद्दल बोलताना ते म्हणाले, “नाही, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी कुठेही जात नाही. मी या शोचा एक भाग आहे. शोचे कथानक असे आहे की माझ्या पात्राकडे सध्या कोणतेही काम नाही. पण लवकरच अब्दु परत येईल. हा कथानकाचा भाग आहे”.
आणखी वाचा – “नराधमांना कधी शिक्षा मिळणार?”, बलात्कार प्रकरणांवर तेजश्री प्रधानचा सवाल, म्हणाली, “आता समाजात…”
शरद पुढे म्हणाला, “हा खूप सुंदर व दीर्घकाळ चालणारा शो आहे आणि मी अब्दुलच्या व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो. ही माझ्यासाठी मोठी ओळख आहे. मग मी हा शो का सोडू? मी शो सोडण्याचा विचारही करु शकत नाही. ‘नीला टेलिफिल्म्स’ हे प्रोडक्शन हाऊस माझ्यासाठी एका कुटुंबासारखे आहे आणि आमचे निर्माते असित कुमार मोदी हे माझे महाविद्यालयीन मित्र आहेत आणि मी शो सोडण्याचे कोणतेही कारण नाही. जोपर्यंत शो चालू आहे. तोपर्यंत मी त्याचा एक भाग राहीन”.
शरद सांकला शो सोडल्याची अफवा पसरली होती कारण ते बरेच दिवस दिसले नव्हते. वास्तविक, गोकुळधाम सोसायटीतील लोक अब्दुल या व्यक्तिरेखेचा वाढदिवस विसरतात, ज्यामुळे तो दुःखी होतो. आणि त्यानंतर तो गायब होतो. त्यामुळे तेथील नागरिक चिंतेत असतात.