शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एआर रहमान यांच्याबरोबर नाव जोडल्यानंतर मोहिनी डेने पहिल्यांदाच केलं भाष्य, सांगितलं सत्य, म्हणाली, “अशा फालतु गोष्टी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 23, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mohini dey on a r rahman controversy

ए आर रहमान यांच्या नात्यावर मोहिनी डे काय म्हणाली?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक ए.आर. रहमान सध्या खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी रहमान यांनी पत्नीपासून वेगळं होणार असल्याची घोषणान केली होती. त्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक चर्चादेखील सुरु झाल्या. याचवेळी रहमानच्या बॅंडमधील बॅसिस्ट मोहिनी डेनेदेखील नवऱ्यापासून वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेलीदेखील बघायला मिळाली. या सगळ्या चर्चेमध्ये रहमान यांनी स्वतः अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक चर्चा करु नये असे आवाहन नेटकऱ्यांना केले. त्यानंतर आता मोहिनीने स्वतः या सगळ्या प्रकणावर भाष्य केले आहे. (mohini dey on a r rahman controversy )

मोहिनीने या सर्व अफवांवर भाष्य केले आहे. तिने त्यांच्या खासगी जीवनाचा सन्मान करण्यास सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “मला अनेकांनी मुलाखतीसाठी अनेकांनी विनंती केली आहे. हे सगळं का आहे? याबद्दल मला माहिती आहे. मला सगळ्यांना सन्मानाने नकार द्यावा लागेल. मला कोणत्याही फालतू गोष्टींना महत्त्व द्यायचे नाही”.

आणखी वाचा – “त्याने विचारलं व्हॉट इज युअर नेम…”, केळवणाला रेश्मा शिंदेचा होणाऱ्या नवऱ्यासाठी उखाणा, म्हणाली, “भेटला पहिल्यांदा…”

View this post on Instagram

A post shared by Mohini Dey (@dey_bass)

पुढे ती म्हणाली की, “मला वाटत की मी माझी एनर्जी अशा अफवांवर खर्च करायची नाही. त्यामुळे माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान करा”. दरम्यान मोहिनी ही रहमान यांच्या बॅंडमध्ये गिटारिस्ट आहे. तिने आजवर झाकीर हुसेन, विलो स्मिथ व स्टीव्ह अशा अनेक संगीतकारांबरोबर काम केले आहे.  वयाच्या नवव्या वर्षी तिने आपले करियर सुरु केले.

आणखी वाचा – Video : नाचता येईना अंगण वाकडं! शाहरुख खानच्या लेकीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान रहमान सायरा बानू यांच्याबरोबर १२ मार्च १९९५ साली विवाह केला. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांनी वेगळं होण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र आतापर्यंत पैशांबद्दल कोणतीही चर्चा केली गेली नाही. सायराच्या वकिलांनी या लग्नामध्ये सायरा यांना खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला असल्याचेही सांगितले होते.

Tags: a r rahmandivorcemohini dey
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sharayu Sonawane On Her Real Wedding

"अगदी खासगी, कमी लोकांमध्ये मी लग्न केलं आणि…", 'पारू'ला आठवलं तिचं खरं लग्न, डेस्टिनेशन वेडिंग केलं तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.