बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक ए.आर. रहमान सध्या खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी रहमान यांनी पत्नीपासून वेगळं होणार असल्याची घोषणान केली होती. त्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक चर्चादेखील सुरु झाल्या. याचवेळी रहमानच्या बॅंडमधील बॅसिस्ट मोहिनी डेनेदेखील नवऱ्यापासून वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेलीदेखील बघायला मिळाली. या सगळ्या चर्चेमध्ये रहमान यांनी स्वतः अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत रहमान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक चर्चा करु नये असे आवाहन नेटकऱ्यांना केले. त्यानंतर आता मोहिनीने स्वतः या सगळ्या प्रकणावर भाष्य केले आहे. (mohini dey on a r rahman controversy )
मोहिनीने या सर्व अफवांवर भाष्य केले आहे. तिने त्यांच्या खासगी जीवनाचा सन्मान करण्यास सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “मला अनेकांनी मुलाखतीसाठी अनेकांनी विनंती केली आहे. हे सगळं का आहे? याबद्दल मला माहिती आहे. मला सगळ्यांना सन्मानाने नकार द्यावा लागेल. मला कोणत्याही फालतू गोष्टींना महत्त्व द्यायचे नाही”.
पुढे ती म्हणाली की, “मला वाटत की मी माझी एनर्जी अशा अफवांवर खर्च करायची नाही. त्यामुळे माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान करा”. दरम्यान मोहिनी ही रहमान यांच्या बॅंडमध्ये गिटारिस्ट आहे. तिने आजवर झाकीर हुसेन, विलो स्मिथ व स्टीव्ह अशा अनेक संगीतकारांबरोबर काम केले आहे. वयाच्या नवव्या वर्षी तिने आपले करियर सुरु केले.
दरम्यान रहमान सायरा बानू यांच्याबरोबर १२ मार्च १९९५ साली विवाह केला. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांनी वेगळं होण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र आतापर्यंत पैशांबद्दल कोणतीही चर्चा केली गेली नाही. सायराच्या वकिलांनी या लग्नामध्ये सायरा यांना खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला असल्याचेही सांगितले होते.