शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेता आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे अनेक चाहते आहेत. आजवर अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याची मुलगी सुहानादेखील आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. २०२३ साली सुहाना झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तीने व्हेरोनिका ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले होते. अशातच आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता सुहानाबद्दलच्या अनेक चर्चा सुरु आहेत. (shahrukh khan daughter get troll)
सुहाना नुकत्याच एका मोबाइलच्या जाहिरातीमध्ये दिसून आली होती. या जाहिरातीमध्ये ती डान्स करतानादेखील दिसत आहे. तिचा डान्स अनेकांना आवडला नाही. तसेच ती खूप विचित्र पद्धतिने डान्स करत असल्याचही अनेक नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. सुहानाचा डान्स बघून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “सोशल मीडियावर तिची नकारात्मक छवि आहे. ती वडिलांना सगळं काही करण्यास सांगू शकते. मात्र टॅलेंट नाही दाखवू शकत”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ती स्क्रीनवर किती चुकीच्या पद्धतीने वावरते. सुहाना सगळ्यात पुढे आहे पण लक्ष सारखं बाजूला उभे असणाऱ्यांकडे जात आहे”.
What’s verdict of Reddit on #Suhanakhan new #Vivo adverthttps://t.co/GM2KvqRSCJ
— Redditbollywood (@redditbollywood) November 22, 2024
त्यानंतर अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “जेव्हा मागे नाचणारे कलाकार लक्ष वेधून घेतात तेव्हा समजतं की ही काही मोठी स्टार नाही”. सोशल मीडियावर इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया येत असूनही ती शाहरुखबरोबर ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभय वर्माबरोबर अभिषेक बच्चनदेखील नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
‘किंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात जानेवारीमध्ये होणार आहे. ‘वॉर २’ मध्ये काम करण्यासाठी अब्बास टायरवालाबरोबरदेखील काम सुरु आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रवीचंद्र यांनी संगीत दिले आहे. यावर आता काम सुरु आहे.