Sharayu Sonawane On Her Real Wedding : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेमुळे अभिनेत्री शरयू सोनावणे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिचं पारू हे पात्र घराघरांत पोहोचलं. याशिवाय अभिनेत्री ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी या पात्रामुळेही शरयूला लोकप्रियता मिळाली. साध्या भोळ्या ‘पारू’ची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. मात्र शरयू ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अभिनेत्रीने लग्नाला वर्ष पूर्ण होताच लग्न केलं असल्याचं जाहीर केलं, गुपित लग्न उरकल्याने अभिनेत्री चर्चेत राहिली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर करत तिने लग्न केला असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली.
‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना शरयूने तिच्या खऱ्या लग्नाची आठवण सांगितली. यावेळी बोलताना शरयू म्हणाली, “माझ्या लग्नाची आठवण सांगायची झाली तर माझं संपूर्ण लग्न हेच आहे, कारण मी माझं लग्न खासगी पद्धतीने केलं. मी कोणाला बोलावलं नव्हतं. माझे जवळचे कुटुंबीय, मित्र-मंडळी आणि मी व माझा नवरा इतकेच यावेळी उपस्थिती होते. एक सुंदर असं डेस्टिनेशन वेडिंग आम्ही केलं. केरबाची वाडी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. लग्नामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंतचा जो माहोल होता तो माझ्यासाठी खास होता”.
“साताऱ्यात घरापासून दूर राहून शूटिंग केलं जातं आहे, तर नवऱ्याकडून कामाप्रती कसा पाठिंबा मिळतो”, असा प्रश्न शरयूला विचारण्यात आला. यावेळी शरयूने उत्तर देत असं म्हटलं की, “खरं सांगायचं झालं तर, नवऱ्याकडून कामाचं कौतुक केलं जातं. जास्त वेळा असं होतं की, तो मला माझ्या चुका सांगतो, आणि मी त्यावर काम करुन ते अधिक चांगलं कसं होईल हे पाहते. संपूर्ण जग कौतुक करत असतं, पण आपल्या जवळचा माणूस आपल्याला चुकीच्या गोष्टी आधी सांगतो. नेहमीप्रमाणे चुका आधी सांगितल्या जातात आणि मग माझं कौतुक केलं जातं”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं, त्रासामुळे रडू लागली अन्…
शरयू व जयंतच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते ही खूप खुश झाले होते. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्सही केलेल्या पाहायला मिळाल्या. शरयूचा नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय ‘सूर सपाटा’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही जयंतने सांभाळली होती.