शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२८ वर्षांच्या ‘त्या’ मुलीमुळे ए आर रहमान व त्यांच्या पत्नीमध्ये वादाची ठिणगी?, वकीलानेच सांगितलं सत्य, म्हणाले, “हा निर्णय…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 21, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
a r rahman divorce

ए. आर. रहमानच्या घटस्फोटासाठी 'ही' मुलगी जबाबदार ?

भारताचे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान सध्या खूप चर्चेत आहे. पत्नी सायरा बानूबरोबर लग्नाच्या २९ वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल स्वतः रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे’. रहमान यांनी एक पोस्ट शेअर करत “लग्नानंतर ३० वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे”, असं लिहिलं आहे. अशातच बॅंडची बेसिस्ट मोहिनी डेनेदेखील वेगळं होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता या कनेक्शनबद्दल चर्चा सुरु झाली आहे. ( a r rahman divorce)

रहमान व मोहिनी यांनी एकाच वेळी वेगळं होण्याची घोषणा केली त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली. याबद्दल आता सायरा यांच्या वकिलाने या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’बरोबर बोलताना वकिलांनी रहमान व सायरा यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “या सगळ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सायरा व रहमान यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे”.

आणखी वाचा – ए आर रहमान यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, घटस्फोटानंतर बायकोला मिळणार इतके पैसे कारण…

“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for…

— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024

दरम्यान रहमान यांनी अधिकृतरित्या घोषणा करत वेगळं होत असल्याचं सांगितलं आहे. हा निर्णय घेणं सायरा व रहमान यांच्यासाठी कठीण असल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, “जेव्हा एखादं लग्न यशस्वी होत नाही तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेणं खूप कठीण असतं. लग्न मोडल्यानंतर कोणीही खुश नसतं. हा आनंद म्हणून कोणीही साजरा करत नाही. सायरा या लग्नामध्ये खूप चढ-उतारांना सामोरी गेली आहे”. मात्र त्यांच्या घटस्फोटाचा वकिलांनी अद्याप खुलासा केला नाही. त्यामुळे नक्की कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आणखी वाचा – “माझा नवरा रुढीवादी मुसलमान…”, कपड्यांवरुन सतत बोलणाऱ्यांना स्वरा भास्करचं उत्तर, म्हणाली, “वाईट वाटतं की…”

ए. आर. रहमान व सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाहीत आणि त्यामुळे अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.     

Tags: a r rahmandivorceviral post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi Actress Gautami Deshpande expressed her displeasure over the low voting turnout in the state of recent held assembly elections 2024.

"लोकशाही अशी चालणार का?", मतदान कमी प्रमाणात झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, "जबाबदारी नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.