AR Rahman- Saira Banu Divorce : देशातील प्रसिद्ध गायक व संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच पत्नी सायरा बानोबरोबर २९ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटाची घोषणा करुन साऱ्यांना खूप मोठा धक्का दिला. घटस्फोटाच्या घोषणेनंतर रेहमानने एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. अफाट संपत्तीचा मालक असलेल्या रेहमानच्या पत्नीला किती पोटगी मिळेल?, हा प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे. एआर रेहमान आणि सायरा बानो यांनी तीन दशके एकत्र घालवली आहेत आणि ते तीन मुलांचे पालक आहेत. अशा परिस्थितीत या जोडप्याच्या घटस्फोटाच्या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे.
मंगळवारी रात्री एआर रहमानची पत्नी सायरा बानो यांनी वकील वंदना शाह यांच्यामार्फत एक निवेदन जारी करुन रहमानबरोबरचे २९ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणले असल्याची घोषणा केली. एआर रहमाननेही त्याच्या एक्स-हँडलद्वारे पुष्टी केली की तो आणि सायरा आता एकत्र नाहीत. एआर रेहमान आणि सायरा बानो या दोघीही मुस्लिम समाजातील असून पोटगीचे नियम वेगळे आहेत. मुस्लिम समाजातील तलाकबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ‘न्यूज१८’ च्या रिपोर्टनुसार, इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे. या अंतर्गत हुंड्याची रक्कम निश्चित केली जाते. याबाबत एक औपचारिक कागद तयार केला जातो आणि दोन्ही पक्ष त्या कागदावर स्वाक्षरी करतात.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन चोरतात लेकाचे चप्पल व बूट, अभिषेक बच्चनने स्वतःच केली पोलखोल, पण आता असं वागण्यामागे कारण काय?
लग्न मोडल्यास किंवा घटस्फोट झाल्यास हुंडा ही रक्कम महिलेला दिली जाते. अशा परिस्थितीत एआर रहमानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सायराला हुंड्याचीच रक्कम मिळणार आहे. मात्र, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. १० जुलै २०२४ च्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की मुस्लिम महिला तिच्या पतीकडून भरणपोषण घेण्यास पात्र आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की सीआरपीसीच्या कलम १२५ च्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पत्नी, मुले आणि अगदी पालकांच्या पालनपोषणाचा निर्णय घेण्याचा अधिकार दंडाधिकाऱ्यांना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. हा निर्णय म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे. जर हा निर्णय आधार मानला गेला तर सायराला एआर रहमानकडून देखभाल भत्ता मिळण्याची पात्रता आहे.
आणखी वाचा – लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक बच्चन नाहीच, ऐश्वर्या रायने एकटीने केलं सेलिब्रेशन, कौटुंबिक वाद आणखीनच वाढला
आता तिला किती देखभाल भत्ता मिळणार हा प्रश्न आहे, हे दंडाधिकारी ठरवतील. न्यायदंडाधिकारी पतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन भरणपोषण भत्ता ठरवतात. एआर रहमान यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत सायराला चांगली रक्कम मिळू शकते. रहमान हा देशातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक-संगीतकार आहे. प्रत्येक गाण्यासाठी तो जवळपास तीन कोटी रुपये घेतो आणि त्याची एकूण संपत्ती १७२८ कोटी ते २००० कोटी रुपये इतकी आहे. एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी तो दोन कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारतो आणि त्यानंतर लॉस एंजेलिससह देशातील अनेक शहरांमध्ये त्याचे बंगले आहेत. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा संग्रहही आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो दरवर्षी चांगली कमाई करतो.