महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. मतदारांनी केलेल्या मतदानानंतर दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राला निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, येत्या शनिवारी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात दिवसभरात ६५ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी ही ४ टक्क्यांनी वाढली आहे. असे असले तरी, मुंबई आर्थिक राजधानी असलेल्या भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही चिंताजनक आहे. (Gautami Deshpande On Low Voter Turnout in State)
विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. यावर आता एका मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे गौतमी शपांडे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : रेवतीबरोबर लग्न करण्यास यशचा नकार, एजेंच्या विरोधात जाऊन लीला नातं जुळवणार का?
गौतमीने राज्यातील मतदानाच्या टक्केवारीचा फोटो शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली केली आहे. “व्वा… खरंच? आम्हाला मतदान करायलाही वेळ नाही? लोकशाही अशी चालणार आहे का? ज्यांनी मतदान केलं नाही, ते छान काम करत आहेत. चांगल्या समाजासाठी मतदान करणे ही आपली जबाबदारी नाही हेच आपण सिद्ध करत आहोत” असं म्हणत गौतमीने याप्रकरणी तिची नाराजी व्यक्त केली आहे. गौतमी ही सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
आणखी वाचा – लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक बच्चन नाहीच, ऐश्वर्या रायने एकटीने केलं सेलिब्रेशन, कौटुंबिक वाद आणखीनच वाढला
अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे कायमच सामाजिक व राजकीय भाष्य करत असते. अशातच तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५ टक्के वाढ झाली असून राज्यात आता ९.६९ टक्के मतदार आहेत. त्यांनी केलेल्या मतदानानुसार रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीप्रमाणे राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे. त्यापैकी सर्वात कमी मतदान हे मुंबई या शहरात झाले आहे.