बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अनेक भूमिकांना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच तिच्या काही भूमिका वादग्रस्तदेखील ठरल्या आहेत. अशातच आता ती पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे अधिक चर्चेत आली आहे. गेल्या आठवड्यात तिचा मौलाना सज्जाद नोमानीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी अनेकांनी स्वरावर टीका केली आहे. संबंधित मौलवीने महिलांच्या अधिकारासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे स्वराला ट्रोल केले गेले. तसेच काहीनी स्वराच्या लूकवरुनही ट्रोल केले. हे नक्की प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेऊया. (swara bhaskar on viral photo)
स्वरा २०२३ साली फहाद अहमदबरोबर लग्नबंधनात अडकली. मुस्लिम मुलाबरोबर लग्न केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फहादबरोबर लग्न केल्यानंतर तिच्यामध्ये किती बदल झाला आहे? याबद्दल चर्चा सुरु आहे. आधी अभिनेत्री कशी असायची? आणि आता स्वरा डोक्यावर ओढणी घेते असेही बोलले गेले. या सगळ्या ट्रोलिंगवर स्वराने उत्तर दिले आहे. याबद्दल तिने ‘एक्स’वर फोटों शेअर करत करत पोस्ट लिहिली आहे.
स्वराने लिहिले की, “मला माहित नव्हतं की माझ्या कपड्यांवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळंच (विचित्र) भांडण होईल. संघी किड्यांना खायला मिळावं म्हणून लग्नानंतरचे माझे काही फोटो आहेतच. पण मला वाईट वाटतं की फहाद अहमद एक रूढीवादी मुसलमान म्हणून तुमच्या कल्पनेमध्ये बसत नाही”.
दरम्यान स्वराने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला सुरवातीची स्वरा व आता डोक्यावर ओढणी घेतलेली स्वरा आहे. तसेच नवऱ्याबरोबरचादेखील एक फोटो आहे. नंतर तिने गरोदरपणाच्या वेळचादेखील फोटो लावला आहे. नंतर तिने मुलाला घेऊन असतानाचादेखील फोटो आहे. २३ सप्टेंबर २०२३ साली तिने मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव राबीया असे ठेवले.