शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानकडून ५ कोटींची खंडणी मागणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, जमशेदपूरमधून भाजी विक्रेत्याला अटक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan Threat Message

सलमान खानकडून ५ कोटींची खंडणी मागणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, जमशेदपूरमधून भाजी विक्रेत्याला अटक

Salman Khan Threat Message  : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. शेख हुसेन शेख मौसीन (वय वर्ष २४) असे आरोपीचे नाव असून तो जमशेदपूर येथील भाजी विक्रेता आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा संदेश आला होता, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी झारखंडचा नंबर ट्रेस केला आणि आरोपींना पकडण्यासाठी झारखंडला पथके पाठवण्यात आली. त्यांनी सांगितले की, आणखी एक टीम गुवाहाटीला पाठवण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला, परंतु मुंबई वाहतूक पोलिसांना त्याच मोबाइल फोन नंबरवरुन माफीचा संदेश प्राप्त झाला, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi नंतर पहिल्यांदाच कोकणातल्या घरी गेली अंकिता वालावलकर, आईला पाहताच घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ व्हायरल

काळवीट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीला सलमान खानकडून माफी हवी आहे, अशी माहिती आहे. याच कारणावरुन सलमानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरही गोळीबार झाला होता. १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तरीही, कामाच्या कमिटमेंटमुळे तो ‘बिग बॉस १८’, ‘सिकंदर’ आणि ‘सिंघम अगेन’ (कॅमिओ) साठी शूटिंग करत आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दामिनी पारू-आदित्यच्या नात्याचा पर्दाफाश करणार, पुरावे दाखवताच अहिल्यादेवींना बसणार मोठा धक्का, सून म्हणून स्वीकारणार का?

बाबा सिद्दीकीच्या हत्येचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही, असे सलीम खान यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले. सलीम खान म्हणाले, “नाही, मला नाही वाटत त्याचा काही संबंध आहे. बाबा सिद्दीकी यांचा याच्याशी काय संबंध असेल? कोणालाही कशाचाही संबंध लावता. तुम्ही आम्हाला सलाम केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू. जर तुम्ही आम्हाला नमस्कार केला नाही तर आम्ही तुम्हाला मारुन टाकू”. सलीम खानला विचारण्यात आले की, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती, कारण ते सलमानला लॉरेन्स बिश्नोईपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तर यावर सलमानचे वडील म्हणाले, “पोलीस सलमान आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देत आहेत. त्यात काय आहे? प्रत्येकाला वाचायचे आहे. आयुष्य जे काही आहे ते कधीही संपू शकते”.

Tags: bollywood newssalman khanSalman Khan Threat Message
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Kranti Redkar shared a video of her daughter is chatting with grandfather see the details

क्रांती रेडकरच्या लेकी आजोबांना सांगतात दिवसभरात काय घडलं?, अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे दाखवला त्यांच्यातील बॉण्ड, भावुक नातं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.