Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रियाच्या गोंधळाची तयारी सुरु असते. प्रियानं नैवेद्यासाठी बनवलेल्या प्रसादात घोळ घातलेला असतो. वडिलांचा फोन येताच प्रियाच्या हातून सर्व रवा करपतो तेव्हा पारूने बनवलेला प्रसादाचा शिरा सावित्री पुढे करते. पारू या गोष्टीला नकार देते. मात्र, सावित्री समजूत काढत तो प्रसादाचा शिरा पुढे करते. प्रिया व प्रीतमच्या गोंधळाला सुरुवात होते त्यानंतर जोगवा मागायला गुरुजी सांगतात. तेव्हा एवढ्या रात्री कुठे जोगवा मागायला जाणार असा प्रश्न श्रीकांत उपस्थित करतो. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, ‘इथे माझ्या भावाचं हक्काचं घर आहे त्यांच्याकडे आपण जोगवा मागायला नक्कीच जाऊ शकतो’, असं म्हणत सगळेच पारूच्या घरी जातात.
अहिल्यादेवी मारुतीला सांगतात की, मुठभर धान्य जरी दिलं तरी आम्ही गोड मानुन स्वीकार करु. तितक्यात दामिनी पुढे येते आणि सांगते की, ‘किर्लोस्करांना मुठभर धान्य देणार का?,काहीतरी महागडी वस्तू तुम्ही जोगवा द्यायला पाहिजे, असेही पारुने लग्नात प्रिया व प्रीतमला काहीच भेटवस्तू दिली नाहीये. त्यामुळे तू तुझ्या गळ्यातली चैन काढून त्यांना दे’. हे ऐकताच पारूला खूप टेन्शन येतं. त्यानंतर पारू घरात जाते आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे आईचे कानातले घेऊन येते आणि प्रिया मॅडमना देते. तेव्हा ती सांगते की, ‘याहून मौल्यवान माझ्याकडे कोणतीच गोष्ट नाहीये’. तेव्हाही दामिनी पारूचा पाणउतारा करते. तेव्हा अहिल्यादेवी दामिनीला शांत करत या मौल्यवान गोष्टीचं मूल्य तुला कळणार नाही, असे म्हणतात. आणि त्यानंतर सगळेच जोगवा घेऊन तिथे आनंदाने परततात.
आणखी वाचा –खुशबू व संग्रामने घरीच साधेपणाने केलं लेकीचं बारसं, मावशी म्हणून तितीक्षाने केली धमाल, व्हिडीओ समोर
जोगवा घेऊन परतल्यावर प्रिया मॅडमचा पदर निरंजनवर जाणार इतक्यात पारू व आदित्य प्रियाला बाजूला करतात, त्यानंतर गुरुजी दिवटीवर तेल वाहायला सांगतात तेव्हा नकळतपणे पारू व आदित्य एकत्रच दिवटीवर तेल वाहतात. गोंधळ झाल्यानंतर अहिल्यादेवी प्रिया व प्रीतमला उद्या देवदर्शनाला जायचं असल्याचे सांगतात आणि पारुलाच बरोबर घेऊन जायला सांगतात. तेव्हा प्रीतम दादालाही मी बरोबर घेऊन जातो असं सांगतो. सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अहिल्यादेवी विचार करत असतात, तेव्हा त्यांना पारू व आदित्य बद्दल विचार मनात येत असतो. गावाकडे ते एकत्र राहिले. आता सुद्धा दिवटीवर त्यांनी एकत्र तेल वाहील हे सगळं काय आहे, हे अहिल्यादेवींना काहीच कळत नाही. तितक्यात तिथे पारू येते. तेव्हा पारू त्यांचा आशीर्वाद घेते आणि देवदर्शनाला जायला निघते. त्यानंतर पारू विचारात असते तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, तू बनवलेला प्रसादाचा शिरा नैवेद्य म्हणून द्यायला नको होतास. हे ऐकून पारू शांत उभी राहते.
दामिनी पारू आदित्यला एकत्र बोलताना पाहते तेव्हा आदित्यने पारूच्या पायात पैंजण घातलेलं असतं हे देखील पारूला कळतं. तेव्हा ती आनंदाने नाचू लागते. हे सगळं काही दामिनी पाहते. मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पैंजण दिलेल्या बॉक्समध्ये आदित्यने एक चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी दामिनीच्या हाती लागते. आता ती चिट्टी घेऊन दामिनी अहिल्यादेवी व श्रीकांत समोर जाते. या चिट्ठीमुळे पारू व आदित्यच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर येईल का हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.