Ankita Walavalkar Kokan Video : ‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्स आणि सर्वांची लाडकी म्हणजेच kokanhearted गर्ल अंकिता वालावलकर. अनेक आशयघन कंटेंट व्हिडीओ बनवत आणि मालवणी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या अंकिताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी अंकिता अचानक ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिसू लागली यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अंकिताने उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांची मन जिंकली.
‘बिग बॉस मराठी’च्या टॉप ५ मध्ये अंकिताने बाजी मारली आणि तिला पाचव्या क्रमांकावर हा खेळ सोडावा लागला. मात्र तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच असं स्थान निर्माण केलेलं पाहायला मिळालं. अंकिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. मूळची कोकणातील असलेली अंकिता ‘बिग बॉस’मध्ये राहिल्यानंतर आता पहिल्यांदाच कोकणात परतली असल्याचं समोर आलं आहे. अनेक व्हिडीओ शेअर करत तिने कोकणात जात असल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा – खुशबू व संग्रामने घरीच साधेपणाने केलं लेकीचं बारसं, मावशी म्हणून तितीक्षाने केली धमाल, व्हिडीओ समोर
कोकणात गेल्यानंतर घरी न जाता ती सर्वप्रथम तिचा व्यवसाय नेमका कसा सुरु आहे हे पाहण्यासाठी संदुद्योग या तिच्या दुकानात जाते. सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्स असलेली अंकिता पेशाने व्यावसायिक सुद्धा आहे. वालावलकर रिसॉर्ट, संदुद्योगचे विविध पदार्थ असे व्यवसाय अंकिता स्वतः पाहते. आता पुन्हा एकदा अंकिता तिच्या गावाकडे गेली आहे आणि इतक्या मोठ्या गॅप नंतर गावाकडे गेल्यानंतर तिची बऱ्याच दिवसांनी तिच्या आईबरोबर सुद्धा भेट झालेली पाहायला मिळतेय.
‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीकमध्ये अंकिताच्या बहिणी व अंकिताचे वडील आले होते मात्र व्यवसायामुळे अंकिताची आई मात्र येऊ शकली नव्हती. त्या वेळेला अंकिताने तिच्या आईला खूप मिस केलं आणि आता शेवटी अखेर अंकिताने तिच्या आईची भेट घेतली. आईला बघून तिने घट्ट अशी मिठी मारलेली ही पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर अंकिताचे हे व्हिडीओ तुफान वायरल होताना पाहायला मिळत आहेत.