मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर तिच्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्राजक्ता नेहमीच काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. मालिका, चित्रपट यांतून प्राजक्ताने अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. असं असलं तरी प्राजक्ताला तिच्या फोटोशूटमुळे विशेष प्रेम मिळालं आहे. प्राजक्ता नेहमीच हटके फोटोशूट करत प्रेक्षकांना मोहिनी घालत असते. (Prajakta Mali Post)
प्राजक्ताच्या फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगलेली असते. अशातच आणखी एका सहज, सुंदर पारंपरिक व मॉडर्न टच असलेल्या फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताचं गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाजात केलेलं फोटोशूट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोशूटबरोबरचं प्राजक्ता तिच्या हटके व लक्षवेधी कॅप्शनमुळे चर्चेत असते. या तिच्या फोटोशूटला दिलेल्या कॅप्शनने ही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्राजक्ताने ग्लॅमरस फोटोशूटसह दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “दिल बहल तो जाएगा इस ख़याल से, हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से,रात ये करार की बेक़रार है, तुम्हारा इंतज़ार है. (गाडी मध्ये हे गाणं ऐकून माझा ड्रायव्हर वैतागलाय, मोबाईल ब्लूटूथ कारला कनेक्ट कर रे, म्हटल्यावर दुर्लक्ष करतो)”. प्राजक्ता या गाण्याच्या प्रेमात पडली असून तिने हे गाणं बरेचदा ऐकलेलं दिसतंय. आणि त्यामुळेच तिचा ड्रायव्हरही या गाण्याला त्रासलेला कळत आहे.
प्राजक्ताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर सिनेसृष्टीतील तिचं स्थान तिने स्वमेहनतीने मिळवलं आहे. अभिनयक्षेत्रात कुणीही वारसा नसताना प्राजक्ताने ही लढाई लढली आहे. कलाकार म्हणून काम करण्याशिवाय ती एक माणूस म्हणून उत्तम आहे. फिट राहणं किती महत्वाचं असतं, याबाबत प्राजक्ता नेहमीच प्रेक्षकांना सांगते असते. फिटनेस रुटीनबरोबरच ती फिटनेसच्या टिप्सही चाहत्यांसह शेअर करत असते.