बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी ८ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मुलीला जन्म दिला. आई-बाबा झाल्याची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या सर्व चाहत्यांसह शेअर केली होती. दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. अशातच आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीप-वीरनं आपल्या चाहत्यांना आणखी एक गोड सरप्राईज दिलं आहे. दोघांनी आपल्या चिमुकलीचं नाव चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे. दोघांनीही (१ नोव्हेंबर, शुक्रवार) लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर चिमुकलीचं नाव ठेवलं असून या संबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Ranveer Singh Deepika Padukone Daughter)
लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचं नाव चाहत्यांबरोबर शेअर केलं असून या दीपिका-रणवीरने मुलीचे नाव ‘दुआ पादुकोण सिंह’ असं ठेवलं आहे. दीपिका आणि रणवीरसाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास आहे. कारण यंदा त्यांच्या गोंडस चिमुकलीची पहिली दिवाळी आहे. अशातच या दोघांनी आपल्या लेकीचे बारसेदेखील पार पाडले आहे. सोशल मीडियावर मुलीचं नाव जाहीर करताना दीपिका-रणवीर यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपवीरच्या गोंडस बाळाची चिमुकली पावलं दिसत आहेत. त्याबरोबरच कॅप्शनमध्ये दोघांनी बाळाचं नाव जाहीर केलं आहे.
आणखी वाचा – ‘द डर्टी पिक्चर’चा सिक्वल येणार, विद्या बालननेच केला खुलासा, आता कसा असणार लूक?
दीपिका-रणवीर यांनी शेअर केलेल्या लेकीच्या फोटोमध्ये लगी सलवार कुर्ता परिधान केली आहे आणि ती तिच्या आईच्या कुशीत आहे. दीपिका पदुकोणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘दुआ पदुकोण सिंह’, दुआ म्हणजे प्रार्थना आणि पुढे त्यांनी लिहिले की हेच उत्तर आपल्याला प्रार्थनेत मिळते. पुढे लिहिले आहे की यावेळी त्यांचे हृदय प्रेम आणि भावनांनी भरलेले आहे. दीपिका पदुकोणच्या मुलीचा जन्म एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाला. सात दिवसांनी दीपिका पदुकोणची मुलगी २ महिन्यांची होणार आहे. पण त्याआधीच दीपिका पदुकोणने आपल्या मुलीचे नाव ‘दुआ पदुकोण सिंह’ ठेवले आहे.
आणखी वाचा – पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…
दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगबद्दल बोलायचे झाले तर दोघेही लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दीपिका पदुकोणच्या ‘कल्की’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. कल्कीच्या वेळी दीपिका पदुकोण प्रेग्नंट होती आणि तिच्या प्रेग्नेंसीबरोबरच तिने चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला होता. अशातच आता दोघे जण ‘सिंघम अगेन’मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.