बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. आजवर तिने हिंदी मालिका तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘भूल भूलय्या ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने खूप चर्चेत आली आहे. याआधी ती अक्षय कुमारबरोबर ‘भूल भूलय्या’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटामध्ये अभिनयाबरोबरच तिचे नृत्यकौशल्यदेखील बघायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा तिच्या अभिनय तसेच नृत्याची झलक बघायला मिळणार आहे. अशातच आता तिच्या एका चित्रपटामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्याला मोठा ब्रेक मिळाला होता. या चित्रपटाचा आता सिक्वल येऊ शकतो आशा चर्चा सुरु आहेत. (vidya balan on the dirty picture)
‘भूल भूलय्या ३’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी विद्या अनेक ठिकाणी हजर राहिली होती. यावेळी तिने ‘डर्टी पिक्चर’बद्दलदेखील चर्चा केली. या चित्रपटाच्या सिक्वलसाठी तयार असल्याचं ती म्हणाली. यासाठी दिग्दर्शक मिलन लुथरिया हे जेव्हा या चित्रपटाची ऑफर घेऊन तिच्याकडे गेले होते तेव्हा ती तयार असल्याचे लगेचच सांगितलं होतं. ती म्हणाली की, “लोक मला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे का की तुमची ओळख वेगळी आहे. पण कोणती ओळख? मी माझं करियर नुकतंच सुरू केलं होतं”.
पुढे ती म्हणाली की, “मला मला काहीतरी वेगळं करायचं होतं. ‘द डर्टी पिक्चर’चा सिक्वल करणार का? असंदेखील विचारण्यात आलं. मी लगेचच तयार असल्याचं सांगितलं”.मी ‘ द डर्टी पिक्चर’चा सिक्वल करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हे माझ्यासाठी खूप चांगलं असेल. अशा प्रकारची भूमिका करून खूप काळ लोटला आहे”.
दरम्यान ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट २०११ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केलं होतं. यामध्ये विद्या बरोबर इम्रान हाशमी, नसीरुद्दीन शाह, तुषार कपूर हे कलाकार होते. तसेच एकता कपूर ही निर्माती होती. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता.