Varun Dhawan Natasha Dalal Daughter Name : वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले. ३ जून रोजी नताशाने बाळाला जन्म दिला. त्यानंतर वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी आनंदाची बातमी दिली. वरुण धवनच्या घरी यावर्षी लहान लक्ष्मीचा जन्म झाला. नताशा व वरुण एका लाडक्या मुलीचे पालक बनले, सध्या हे जोडपे पालकत्वाचा आनंद घेत आहे. वरुण धवन त्याच्या आगामी वेब सीरिज सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काल रात्री वरुन अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचला. जिथे बिग बींनी त्याला त्याच्या मुलीचे नाव विचारले.
मुलीचं नाव काय ठेवलं हे वरुण व नताशा यांनी यापूर्वी काही सांगितलं नव्हतं. आता वरुणने आपल्या लाडक्या लेकीच्या नावाबद्दल खुलासा केला आहे. वरुण धवनने लेकीचे नाव काय ठेवले आहे हे सर्वांसमोर सांगितले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये वरुण धवन दिग्गज चित्रपट निर्माता राजसह हॉट सीटवर बसला होता. शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मेगास्टारने वरुण व नताशा दलाल यांच्या बाळाचे नाव विचारले. अभिनेत्याने लेकीचे नाव लपवून न ठेवता त्याने त्याच्या पहिल्या मुलाचे नाव लारा ठेवले असल्याचे सांगितले.
आणखी वाचा – अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…
दिवाळी साजरी करण्याबद्दल बोलताना बिग बींनी वरुणला सांगितले की, हे वर्ष त्याच्यासाठी आणखी खास आहे कारण तो आपल्या लक्ष्मीबरोबर घरीच यंदाची ही दिवाळी साजरी करणार आहे. यावर अभिनेत्याने हो म्हणत सहमती दर्शवली. ‘लारा’ हा लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. सुंदर, लोकप्रिय आणि तेजस्वी असे वेगवेगळे या नावाचे अर्थ आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. “मी अजूनही तिच्याशी संपर्क साधायला शिकत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाळ घरी आल्यावर सर्वकाही बदलते”, असेही धवन म्हणाला.
आणखी वाचा – ‘बडे अच्छे लगते है’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, १० वर्षानंतर तीच जोडी दिसणार, उत्सुकता वाढली
पहिल्यांदा वडील बनलेल्या वरुणने असा खुलासा केला की, तो रात्री झोपला असला तरी तो अनेकदा उठतो. वरुणने अमिताभ बच्चन यांच्याकडे पालकत्वाचा सल्लाही मागितला. अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन लहान होते तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी कधी रात्री जागावं लागलंय का, असं वरुणने विचारल्यावर बिग बी म्हणाले, “मी तुला एकच गोष्ट सांगेन की तुझ्या पत्नीला आनंदी ठेव, ती आनंदी असेल तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. सुखी आयुष्याचा हा एकच फॉर्म्युला आहे”.