बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या अभिनयातून सगळ्यांनाच वेड लावलं आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना वेड लावतो. यावर्षीच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर बरीच धुमाकुळ घातली होती. शाहरुखने आजवर बरेच चित्रपट केले आहेत. ९० च्या दशकातील त्याचे चित्रपट तर आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. मग ‘कुछ कुछ होता है’ मधील राहुल असो किंवा ‘मै हूँ ना’मधील त्याचा हटके अंदाज असो त्याने आजवर सगळ्या पात्रांमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. अशा या सुपरस्टारचा शाहरुख खानचा आज ५८ वा वाढदिवस आहे. शाहरुखचा वाढदिवस म्हटला की मन्नतच्या बाहेरील त्याच्या चाहत्यांची गर्दी आठवते. त्याच्या चाहत्यांना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या वाढदिवासाची उत्सुकता लागून असते. (shah rukh khan comes out mannat balcony to meet fan)
त्यामुळे वाढदिवसादिवशी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. एक दिवस आधी अगदी रात्रीपासूनच मन्नतच्या बाहेर त्याचे चाहते गर्दी करून उभे असतात. पण यासगळ्यांना शाहरुख कधीच निराश करत नाही. अगदी काल मध्यरात्रीदेखील शाहरुखने चाहत्यांकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मन्नतच्या बाहेर हजेरी लावली.
सध्या सोशल मीडियावर काल रात्रीचे बरेच फोटो व्हायरल होत आहे. रात्रीच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये शाहरुख त्याच्या मन्नतच्या बाहेरील बाल्कनीत उभा असलेला दिसून येत आहे. यावेळीही शाहरुखने काळ्या रंगाचा टी-शर्ट व डोक्यावर टोपी घातली होती. तर बाहेर चाहत्यांची बरीच गर्दी दिसत होती. या फोटोंमध्ये शाहरुखला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर अगदी खुलून दिसत आहे. शाहरुखच्या आयुष्यातील या खास दिवशी त्याच्या चाहत्यांनी लावलेली हजेरी आणि त्यांच्याकडून मिळणारं प्रेम पाहून शाहरुखचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यावेळी शाहरुखने तिथल्या सगळ्यांचे आभारही मानले.
It’s unbelievable that so many of u come & wish me late at night. I am but a mere actor. Nothing makes me happier, than, the fact that I can entertain u a bit. I live in a dream of your love. Thank u for allowing me to entertain you all. C u in the morning…on the screen & off it
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2023
याशिवाय शाहरुखने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक खास ट्विट लिहीलं आहे. शाहरुख लिहितो, ‘हे अविश्वसनीय आहे की रात्री उशिरापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने इतके सगळे लोक मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मी फक्त एक अभिनेता आहे. खरं सांगू तर या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे की मी तुमचं थोडं फार मनोरंजन करु शकलो. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप अनमोल आहे. तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद की मी तुमचं मनोरंजन करू शकेन यासाठी मला तुम्ही लायक समजता’, असं लिहीत त्याने चाहत्यांचे आभार व्यक्त केले.