सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘आई कुठे…’मधील ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता पहिल्यांदाच करत आहे विमानप्रवास, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “ऊंच ऊंच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 2, 2023 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niranjan Kulkarni Post

Video : 'आई कुठे…'मधील 'हा' सुप्रसिद्ध अभिनेता पहिल्यांदाच करत आहे विमानप्रवास, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "ऊंच ऊंच…"

कलाकार मंडळींना नेहमीच कामानिमित्त अनेक परदेश दौरे करावे लागतात. दरम्यान हे दौरे करताना ते विमानाने प्रवास करणं सोयीचं समजतात. विमानाने प्रवास करताना त्यांना आलेले अनुभव ते कायमच सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याचा पहिल्या विमान प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा विमान प्रवास या अभिनेत्याने पहिल्यांदाच केला असल्याचं समोर आलं आहे. शिवाय मेहनतीच्या जोरावर आणि स्वखर्चाने त्याने हा विमान प्रवास केला आहे. हा अभिनेता आहे निरंजन कुलकर्णी. (Niranjan Kulkarni Post)

छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी हा ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतील त्याची अभि ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली असून त्याच्या या भूमिकेवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होतो. अभिनयाबरोबरच निरंजन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याचे अनेक फोटोज व व्हिडिओज त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. अशातच निरंजनने शेअर केलेल्या त्याच्या पहिल्या विमान प्रवासाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.

आणखी वाचा – “लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारुन थुंकला आणि…”, किरण मानेंनी शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाले, “तू पाकिस्तानमधील…”

View this post on Instagram

A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)

निरंजन कुलकर्णीने त्याच्या पहिल्या विमान प्रवासाचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून त्याने, “पहिला विमान प्रवास, ऊंच ऊंच अन् दूर” असं म्हटलं आहे. हा प्रवास निरंजनचा पहिला प्रवास असून तो कुठेतरी फिरायला जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. पहिला विमानप्रवास हा सर्वांसाठीच खास असतो, त्याची आठवण ही बरेचजण सोशल मीडियावरून शेअर करतात. अशातच निरंजनच्या या पहिल्या विमान प्रवासाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या या प्रवासाबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “माझ्या हजारो चुका…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “सगळंच संपलं…”

निरंजन एक उत्तम अभिनेता आहेच, या शिवाय तो एक उत्तम व्यावसायिकही आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निरंजनने स्वतःचं कॅफे ठाण्यात सुरू केलं आहे. निरंजनने २५ हुन अधिक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, मात्र त्याला खरी प्रसिद्धी ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे मिळाली आहे.

Tags: aai kuthe kay karteentertainmentfirst flight experiencemarathi actorniranjan kulkarni
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
अभिमानास्पद! तीन मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

अभिमानास्पद! तीन मराठी चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.