मराठी सिनेसृष्टीतील लेखक, अभिनेते व दिग्दर्शक अशी बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. त्यांनी आपल्या विविधांगी भुमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. आजवर त्यांनी ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ सारख्या चित्रपटातून आपली वेगळी छाप पाडली. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी नवीन प्रवीण तरडेंची ओळख करून देत होता. त्यांनी आपल्या अभिनयातून मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी स्नेहल तरडे ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने देखील ‘देऊळबंद’, ‘धर्मवीर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. स्नेहल सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकताच स्नेहलने त्यांच्या घरातील मांजराचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. (snehal tarade share a video of her cat)
स्नेहलने एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बऱ्याचदा ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षणांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. असाच एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम शेअर केला आहे. त्यात त्यांची मांजर बेडवर बसून मोबाईलवर कार्यक्रम बघताना दिसते आहे.
हा व्हिडीओ शेअर करत ती लिहीते, ‘आता हेच बघायचं राहिलं होतं रे देवा! माणसं तर केव्हाच वेडी झाली आहेत. पण आता प्राण्यांनाही वेड लागेल या मोबाईलचं. पूर्ण एपिसोड पाहिलाय माझ्या मांजरीने.. पूर्ण!’, असं लिहीत तिने त्यांच्या मांजरीलाही मोबाईलचं वेड लावलं असल्याचं सांगितलं. हा विनोदी व्हिडीओ शेअर करत तिने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

या व्हिडीओला बरेच लाईक व कमेंट आले आहेत. नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट करत या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘मॅम तुम्हीच सवय लावली आहेत’, असं लिहीत हसण्याचा इमोजी शेअर केला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, ‘हो खरं आहे. प्राण्यांनाही टिव्ही पाहायला आवडतं’, अशी कमेंट केली आहे.