भारतात काही दिवसांपासून विश्वचषकाचं वातावरण चांगलच रंगात आलं होतं. रविवारी म्हणजे १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या विश्वातील बलाढ्य संघामध्ये हा सामना चांगलाच रंगला. संपूर्ण देशाला भारताच्या विजयाची अपेक्षा होती. पण भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीने संपूर्ण विश्वचषक सामन्यांप्रमाणे या सामन्यातही उत्कृष्ट खेळी करत अर्धशतकी खेळ केली होती. मात्र ऑस्ट्रेलियन संघासमोर भारताचा खेळ चालला नाही. ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ गडी राखून विजय संपादन केला. हा सामना बघायला बरेच दिग्गज उपस्थित होते. विराट कोहलीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्माही सामना पाहायला आली होती. भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीला हिंमत देताना दिसली. त्यांचा एक एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (anushka sharma hug virat kohli after team india lost)
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा गेंदबाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी २४० धावांचं लक्ष ठेवलं. जे लक्ष ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर खूप कमी होतं. ऑस्ट्रेलियाने हा आकडा ६ गडी राखून अगदी सहजरित्या पूर्ण केला. भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघासह संपूर्ण भारतीयांना नैराश्येचा सामना करावा लागला.
कर्णधार रोहित शर्मादेखील मैदानात भावनिक झालेला पाहायला मिळाला. त्याचा अश्रु पुसतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सामन्यानंतर विराट व अनुष्काचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात अनुष्का विराटला हिंमत देताना दिसली. या फोटोत दोघांच्या चेहऱ्यावर भारतीय संघाला मिळालेल्या पराभवाचं दुःख दिसत होतं.
आणखी वाचा – अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियांका चोप्राने विकलं मुंबईतील घर, एकूण किंमत आहे…
अनुष्का शर्मा प्रमाणे इतर दिग्गज मंडळीही हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता रणवीर सिंह, शाहरुख खान तसंच त्याचं पूर्ण कुटुंबही स्टेडियमवर पोहोचलं होतं. अभिनेत्री अथिया शेट्टीदेखील भारतीय संघाला व तिच्या नवऱ्याला केएल राहुलला पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती. पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीयांचे सगळ्यांचे चेहरे लटकलेले पाहायला मिळाले.