बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं असं नाव कोरणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २००३मध्ये तिने ‘द हिरो: स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंन्ट्री केली होती. तिने आजवर बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये तिने हॉलिवूड गायक निक जोनाससह लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती भारतातून लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली. आता तिथे ती तिच्या कुटुंबाबरोबर राहत आहे. त्यामुळे नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, तिने मुंबईतील तिची दोन अपार्टमेंट विकली असल्याचं समोर येत आहे. दिग्दर्शक व लेखक अभिषेक चौबे याने प्रियांकाचं घरं खरेदी केल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी तिने चांगलीच रक्कम घेतली असल्याचं समोर येत आहे.(Priyanka chopra sells Mumbai house to director)
प्रियांका चोप्राचे अंधेरीतील हे घर अंधेरीतील लोखंडवालामध्ये करण अपार्टमेंट टॉवरच्या ९व्या मजल्यावर आहे. जे एकूण २,३०० स्क्वेअर एवढं आहे. त्यांचा हा व्यवहार प्रियांकाची आई मधू चोप्रा हिच्या मदतीने झाला असून २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान हा व्यवहार पूर्ण झाला. यात अभिषेक चौबेने एकूण ३६ लाख रुपये देऊन घर त्याच्या नावावर करुन घेतलं. प्रियांकाने लोखंडवालातील मालमत्ता ७ कोटी रुपयांना विकली होती. ती जागा त्याने २०२१मध्ये भाड्याने घेतली होती.
प्रियांका तिच्या बोल्ड अंदाजासाठी आणि उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखली जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं नेहमी कौतुक होताना दिसतं. प्रेक्षकांच्या मनात तिचं वेगळं असं स्थान आहे. तिने अलीकडे तिचा नवरा निकबरोबर दिवाळी पार्टी आयोजित केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. त्यात प्रियांका, प्रिती झिंटा आणि निक हे एकत्र दिसले होते. या पार्टीत इतरही मंडळी समाविष्ट झाली होती.
प्रियांका ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटात जॉन सीना व इद्रिस एल्बाबरोबर पडद्यावर दिसणार आहेत. याशिवाय ती ‘जी ले जरा’मध्ये आलिया भट्ट, कतरिना कैफबरोबर दिसणार आहेत. त्याचबरोबर ती ‘डॉन ३’ चित्रपटातही रणवीर सिंहबरोबर स्क्रिन शेअर करणार असल्याचं बोललं जात आहे.