शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने ५७व्या वर्षी पत्नीबरोबर केलं दुसऱ्यांदा लग्न, हिंदू पद्धतीने पार पडला विवाहसोहळ, लिपलॉक केलं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood and television actor ronit roy renewed his wedding with wife neelam singh on 20th anniversary video viral on social media

सुप्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने ५७व्या वर्षी पत्नीबरोबर केलं दुसऱ्यांदा लग्न, हिंदू पद्धतीने पार पडला विवाहसोहळ, लिपलॉक केलं अन्...

प्रसिद्ध टीव्ही व बॉलिवूड अभिनेता रोनित रायने काल (२५ डिसेंबर) रोजी पत्नी नीलम बोसबरोबर लग्नाचा २०वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वीस वर्षांच्या संसारानंतर रोनित-नीलम यांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. रोनितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मुझसे शादी करोगी? फिर से” असं कॅप्शन लिहित रोनितने हा व्हिडीओ शेअर केला केला आहे. एका मंदिरात मोजक्या कुटुंबीयांच्या व पाहुण्यांच्या उपस्थितीत रोनित-नीलम यांनी एकमेकांबरोबर लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या लग्नसोहळ्यात त्यांचा मुलगादेखील साक्षीदार होता. (Ronit Roy On Instagram)

रोनितने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघे पती-पत्नी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करताना दिसत आहेत. या खास लग्नसोहळ्याला रोनितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर नीलमने लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. ‘दुसऱ्यांदा काय, हजार वेळा मी तुझ्याशीच लग्न करेन. लग्नाच्या २०व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रोनितने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओखाली एकाने “लोक पाच वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत आणि तुम्ही लग्नाच्या वीस वर्षांनंतर पुन्हा लग्न करत आहात. खूपच सुंदर” तर दुसऱ्याने “खरं प्रेम या जगात अस्तित्वात आहे” असं म्हणत कमेंट केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी दोघांना कमेंट्सद्वारे आशीर्वाददेखील दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

आणखी वाचा – ‘रमा राघव’ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लागली हळद, हातावर मेहंदीमध्ये शिवनेरी बस, मुंबई-पुणेची डिझाइन, फोटो व्हायरल

दरम्यान, रोनितचं हे दुसरं लग्न असून त्याचं पहिलं लग्न हे जोआनाबरोबर झालं होतं. पण काही कारणांनी ते विभक्त झाले. त्यानंतर रोनित अभिनेत्री नीलम सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यानंतर एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी एकत्र संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. नीलमने याआधी ‘सिलसिला है प्यार का’, ‘सुराग’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आणखी वाचा – प्रसिद्ध कॉमेडियन नील नंदाचे निधन, वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

रोनित हादेखील छोट्या पडद्यावरील खूपच लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘कसौटी जिंदगी की’, ‘मिस्टर बजाज’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर पती, वडील व मुलाची भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या अभिनयासाठी त्याला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Tags: bollywod actorbollywood newsentertainment newsentertainment update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : सुशांत सिंग राजपूतचे इंटिमेट सीन पाहिल्यानंतर अंकिता लोखंडेची झालेली अशी अवस्था, म्हणाली, "आम्ही जवळीक साधायचो तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.