बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. आजवर प्रियांका अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही ती कमाल करताना दिसत आहे. २०१८ साली प्रियांका व निक लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंतीदेखील दर्शवली आहे. प्रियांका सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेलीदेखील दिसते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच आता निक व प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आलेले बघायला मिळतात. निकने प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्कला पाठिंबा दर्शवल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.(priyanka chopra husband troll)
निकने ‘एक्स’वर एलन मस्कला पाठिंबा देताना दिसला आहे. त्याने एलन मस्कच्या जोनस ब्रदर्सच्या मीमवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे ट्विट चाहत्यांना पसंतीस उतरले नाही. तसेच मस्कचे समर्थन केल्याने निकला ट्रोलदेखील करत आहेत. १७ डिसेंबर रोजी एलन मस्कने टेस्ला ओनर्स सिलिकॉन व्हॅलीच्या ‘एक्स’ पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये लिहिले होते की, “डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यामुळे कंपनीला अधिक नफा झाला आहे”.
Take us to the Year 3000. https://t.co/vk0sdBhrXS pic.twitter.com/CSG7ItCmES
— Nick Jonas (@nickjonas) December 17, 2024
एलन मस्कने जोनस ब्रदर्सच्या मीमबरोबर ट्विट पुन्हा एकदा शेअर केले आहे. यामध्ये निक व केविन एक टेबल फिरवत होते. त्यांनी पुढे लिहिले की, “अरे देवा, बाजी कशी पलटली?”, यावर उत्तर म्हणून निकने एलन मस्कचा बोट दाखवतानाचा एक फोटो शेअर केला व लिहिले की, आम्हाला ३००० व्या वर्षात घेऊन चला”. हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि काही काळातच २७.१ मिलियन वेळा बघितले गेले.
ही गोष्ट निकच्या चाहत्यांना आवडली नाही. निक एलन मस्कला पाठिंबा देत आहे असा अर्थ काढला गेला. एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही ट्रम्प पोस्ट आहे का? प्रियांका तुझ्या नवऱ्याला सांभाळ”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “प्रियांका तुझ्या नवऱ्याला ताब्यात ठेव”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “प्रियांका, खूप उशीर होण्याआधीच याच्या हातातून फोन काढून घे”. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.