स्टार प्रवाह वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सुरू झाली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १७ मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेने आता नवीन वळण घेतलं असून या मालिकेतील मुख्य पात्र असलेले जानकी आणि ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे हे मालिकेमध्ये शेती करताना दिसत आहेत. मालिकेतील या सीनसाठी रेश्मा शिंदेने खास तयारी केली होती. या सीनचं चित्रीकरण आऊटडोअर झाले होते आणि या खास सीननिमित्त रेश्मा शिंदेने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. (Reshma Shinde mauled by a bull)
यावेळी रेश्मा शिंदेने तिची एक लहानपणीची जुनी आठवण शेअर सांगितली आहे. यावेळी रेश्माला लहानपणी एका बैलाने उचलून फेकल्याच्या भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला बैलाने उचलून फेकलं होतं. मी तेव्हा चार-पाच वर्षांची होते. मामा त्याला चारा टाकायला गेला होता. तर मी त्या बैलाच्या खूपच जवळ गेले होते आणि त्याची शिंगं वगैरे खूप मोठी होती. तर त्याने माझ्या फ्रॉकमध्ये शिंगं घुसवली आणि थेट उडवूनच दिलं. त्यानंतर मला भीती वाटली. पण आता ठीक आहे”.
आणखी वाचा – डीपी व अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्यासह आर्या जाधवला दिलं बर्थडे सरप्राइज, रॅपर खुश, म्हणाली, “जीजू आणि…”
या मालिकेमधील जानकी म्हणजेच रेश्माने नुकतंच लग्न केलं. पवनबरोबर तिने लग्नगाठ बांधली असून या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान ‘घरोघरी मातीच्या चुली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रेश्मा शिंदेची भूमिका ही साधी, संस्कारी, कुटुंबाला सर्वोच्च स्थान देणारी, कोणत्याही परिस्थितीला धाडसाने सामोरी जाणारी अशी आहे.
आणखी वाचा – आधी भांडण, मतभेद आता सासूबाईंकडून अंकिता लोखंडेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “आमच्या कुटुंबात येऊन…”
मालिकेत सध्या ऐश्वर्या ही तिची जाऊ तिला त्रास देण्यासाठी सतत काही ना काही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्यामुळे जानकीला तिच्या पती व मुलीसह घराबाहेर पडावे लागले आहे. आता ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर कसे व कधी येणार आणि जानकीची खरी बाजू सर्वांना कधी समजणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत