टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज ४० वा वाढदिवस आहे. इंदूरमध्ये जन्मलेल्या अंकिता लोखंडेचे खरे नाव तनुजा लोखंडे होते. तिने २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये तिने अर्चना देशमुखची भूमिका साकारली होती. या शोमुळे ती घराघरांत पोहोचली आणि अल्पवधीतच ती टेलिव्हिजनची मोठी स्टार बनली. मालिकांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने सिनेस्टार की खोज या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. (ankita lokhende mother in law birthday wish)
अनेक रियालिटी शोमधून व मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीलं येणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात सहभाग घेतला. अंकीताने तिचा नवरा विकी जैनसह सहभाग घेतला होता. नंतर काही काळाने या शोमध्ये तिची सासूही आली होती. यादरम्यान अंकिता व तिची सासू यांच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अंकिताला सासूचा सासुरवास भोगावा लागत असल्याच्या अनेक चर्चादेखील नेटकऱ्यांमध्ये रंगल्या होत्या. मात्र आता अंकिताच्या सासूने सुनेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
अंकिताने सासूची प्रतिक्रिया तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “तुझा वाढदिवस तुझ्यासाठी इतका आनंद घेऊन येवो, जितका आनंद तू या कुटुंबात घेऊन आली आहेस. माझ्या मुलीसारख्या सूनेला तिचा खास वाढदिवस प्रेमाने भरलेला जावो. तुझी सासू असल्याचा मला अभिमान आहे! आपल्या संपूर्ण परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.
आणखी वाचा – डीपी व अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्यासह आर्या जाधवला दिलं बर्थडे सरप्राइज, रॅपर खुश, म्हणाली, “जीजू आणि…”
दरम्यान, अंकितताने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी अंकिताला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या सासूचेही कौतुक केलं आहे. “सर्वांना अशी सासू मिळो”, “तू खूप भाग्यवान आहेस”, “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, बिग बॉसनंतर अभिनेत्री लवकरच पुन्हा एकदा ‘लाफ्टर शेफ’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे