बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या अधिक चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. सध्या ती ‘स्त्री २’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आली आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता राजकुमार रावदेखील मुख्य भूमिकेत आहे. याआधी चित्रपटाचा पहिला भाग ‘स्त्री’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही तुफान कमाई केली आहे. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. श्रद्धाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्स वेगाने वाढ होत आहे. यामध्ये श्रद्धाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील मागे टाकले आहे. (shraddha kapoor instagram followers)
श्रद्धा इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्याबाबतीत श्रद्धाने तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांना मागे टाकले आहे. आता सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा व क्रिकेटपटू विराट कोहलीचादेखील समावेश आहे. मात्र काही अंकांनीच श्रद्धा पंतप्रधानांच्या पुढे आहे. श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर ९१.४ मिलियन फॉलोअर्स आहेत तर पंतप्रधान मोदी याने ९१.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
यामध्ये विराटचे २७१ मिलियन फॉलोअर्स असून त्याचे पहिले स्थान अढळ आहे. जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जणाऱ्यांमध्ये विराटचा समावेश आहे. तसेच त्यानंतर प्रियांकाचा क्रमांक असून तिचे ९१.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. श्रद्धानंतर आलिया भट्टचा चौथा क्रमांक आहे. त्यानंतर कतरिना कैफ, दीपिका पदुकोण व नेहा कक्कर यांचादेखील समावेश आहे.
श्रद्धाचा सध्या ‘स्त्री २’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली असून त्याचे आकडे आता समोर आले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. १५ ऑगस्टला सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. मंगळवारी २५.८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली तसेच भारतात आतापर्यंत या चित्रपटाने २५८.०९ कोटी रपये कमाई केली आहे.