बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याचप्रमाणे हॉलिवूडमध्येही स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच तिचे वैयक्तिक आयुष्यदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेले पाहायला मिळते. २०१८ साली ती अमेरिकन पॉपस्टार निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांच्या वयातील अंतरामुळे तिला खूप ट्रोलदेखील केले गेले. त्यानंतर सरोगसी पद्धतीने एका मुलीचे आई-वडील झाले. मुलीचे नाव त्यांनी मालती मेरी असे ठेवले. मुलीचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती शेअर करत असते. (priyanaka chopra daughter video)
प्रियांकाप्रमाणेच निकदेखील स्वतःच्या अकाऊंटवरुन मुलगी मालतीचे फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये मालती निकचा हेअर कट करताना दिसत आहे. तसेच बोबडे बोलदेखील ऐकायला मिळत आहेत. तसेच निकदेखील लेकीचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
सध्या प्रियंका तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’ व ‘हेड्स ऑफ स्टेट’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकताच निक ऑस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्टमध्ये पत्नी व मुलगी मालतीला भेटण्यासाठी गेला होता आणि त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवला. प्रियंकाने देखील काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिघंही मजा-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच तिने चित्रपटाच्या सेटवरीलदेखील काही फोटो शेअर केले आहेत.
त्याचप्रमाणे तिने कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या शेड्यूल संपण्याचीदेखील घोषणा केली आहे. तिने “‘द ब्लफ’ च्या चित्रपटाचे शेड्यूल संपले. हे करताना माझे कुटुंबं माझ्याबरोबर आहे आणि हे सर्व शक्य करण्यासाठी चांगल्या लोकांची मला साथ मिळाली ही अभिमानाची गोष्ट आहे”, असे लिहिले आहे.