Tharala Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की, सायलीला लाडू बनवताना पाहून प्रतिमाला आनंद होतो. सायली मागे वळताच प्रतिमा स्वतःहून लाडू बनवायला घेते. सायली प्रतिमाकडे बघतच बसते. सायली प्रतिमाला अजून तूप काढून देते. स्वतः सायली लाडू बनवायला घेताच मिश्रण कसे ढवळायचे हे प्रतिमा सायलीला दाखवते. शिवाय सायलीला लाडू वळायला पण प्रतिमा दाखवते. हे बघून कल्पना व पूर्णा आईला आनंद होतो. प्रतिमाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच प्रतिमा घाबरून तिथून निघून जाते, पूर्णा आई तिला थांबायला सांगूनही ती खोलीत निघून जाते.
पूर्णा आईला वाईट वाटतं, पण सायली प्रतिमाने स्वतः लाडू केला हे चांगले घडल्याचे पूर्णा आईला सांगते. सायली पूर्णा आईला लाडू देताच पूर्णा आई प्रतिमा माणसांना विसरली तरी तिच्या हातची चव तीच असल्याचे सांगते. प्रतिमाची स्मृती परत यायला स्वयंपाकघर महत्वाचे असल्याचे सायली सांगते. हे तन्वी नेमके ऐकते आणि प्रतिमाची स्मृती परत येऊ न देण्याचे मनातल्या मनात म्हणते. सायली, कल्पना, पूर्णा आई आणि विमल प्रतिमा काय बनवू शकते याची यादी लिहितात तेवढयात तन्वी तिथे येते आणि हे सगळं बंद केले पाहिजे असं ठरवते.
तन्वी म्हणजेच प्रिया आईला कामाला लावू नका वाटल्यास नोकर रविराजशी बोलून बोलवून घेऊ आणि तशी पण सायली व विमल कामाला आहेच असंही बोलून जाते. हे ऐकून पूर्णा आई चिडते आणि मी प्रतिमाची आई असल्याने अधिकार फक्त मलाच असल्याचे तन्वीला सुनावते. खोलीत प्रतिमा शिवण काम करत असते, तेव्हा सायली चिंच गुळाची आमटी करत असल्याने चहाचा कप ठेवून द्यायला प्रतिमाला सांगते. पण प्रतिमा स्वतः कप ठेवण्याचे सांगते.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली आमटी करताना गुळाचे प्रमाण विमलला विचारताच प्रतिमा सायलीला प्रमाण दाखवते. हे पाहून पूर्णा आई व कल्पना जास्त आनंदी होतात. पण तन्वी म्हणजेच प्रिया हे पाहून अस्वस्थ होते.