Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला दमदार सुरुवात झाल्यानंतर या खेळाची व घरातील स्पर्धकांची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. इतर स्पर्धकांप्रमाणे अभिनेत्री योगिता चव्हाणचीही सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. मात्र तिची चर्चा आहे ती या घरातून बाहेर येण्याबद्दलची. पहिल्याच आठवड्यात तिला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते, मात्र अभिनेत्रीला तिच्या प्रेक्षकांनी मत दिले आणि सुरक्षित केले. मात्र यावेळी तिने तिला या घरातून बाहेर जायचं आहे असं म्हटलं. रितेशने योगिता चव्हाणचं कौतुक करताच अभिनेत्रीला अश्रू अनावर होऊन तिने घरात राहायचे नसल्याची इच्छा बोलून दाखवली. तिचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
यावेळी योगिताला रितेशसमोर अश्रू अनावर झाले, तिने कसलाही विचार न करता असं म्हटलं की, “मी संपूर्ण टीमची माफी मागते. मला माहिती आहे, हे योग्य नाही. मला सगळे सांगतात तू इथे कशाला आलीस. माझंही चुकलं हे मी मान्य करते” यानंतर ती रडू लागते. यानंतर रितेश सांगतो, “इथे कोण राहणार…कोण जाणार हे माझ्या हातात नसत. या सगळ्या गोष्टी ‘बिग बॉस’ ठरवतात”. अशातच कालच्या भागात निक्कीने घरातील सर्व सदस्यांचे कपडे फेकून दिल्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांमध्ये कल्ला झाला. निक्की जान्हवी अरबाज वैभव इरीना पॅडी अभिजीत वर्षा यांनी घरात राडा केला. यादरम्यान त्यांच्यात भांडणही झालं. त्यामुळे हे भांडण ऐकून योगिता रडू लागली.
मग थोड्या वेळाने ‘बिग बॉस’ने योगिताची विचारपूस केली. तेव्हा योगिताने असं म्हटलं की, “तुम्ही मागे एकदा सांगितल्याप्रमाणे मी खूप खंबीर व सक्षम राहण्याचा प्रयत्न करत आहे. मी सुरु असलेल्या भांडणांपासूनही लांब जाते. मी कुणालाच उलट उत्तर देत नाही. मी कोपयात निघून जाते. पण मी हे किती दिवस करू शकते”. यापुढे ‘बिग बॉस’ तिला हे असं वाटण्याबद्दल सहानुभूती असल्याचे म्हणतात. “तसंच इथे कुणीही तुम्हाला जबरदस्तीने खंबीर राहायला सांगत नाही. मी (बिग बॉस) किंवा रितेश आपल्याशी बोलले ते मनोबल वाढवण्याचा प्रयत्न होता” असं म्हणतात. यावर योगिता मला याचं कौतुक असल्याचं म्हणते.
त्यानंतर ‘बिग बॉस’ तिला “या घरात येण्याचे नियम व अटी तुम्हाला माहीत होते? हा खेळ कसा खेळला जातो हेही माहीत होतं?” असा प्रश्न विचारतात. यावर योगिता “मला सगळं माहीत होतं. पण इथे इतकी आक्रमकता आहे. चुकीच्या पद्धतीने नियम मोडून खेळत असतील याची मला कल्पना नव्हती” असं म्हणते. तसंच यापुढे ती मी स्वत:ला पूर्ण एक आठवडा दिला. या दिवसांत मी घरी जाईन या अपेक्षेने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. पण ते झालं नाही. पण तरीही मी बरी होते. मी नाराज होते, पण मी बरी होते. तुम्ही टीमशी बोला. माझ्याकडून त्यांना विनंती करा. मला ती ट्रॉफी नको आहे. मी बाहेर जाऊन शांत राहण्याचा प्रयत्न करेन.
दरम्यान, यापुढे ‘बिग बॉस’ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ते तिला असं म्हणतात की, “बाहेर ट्राफिकचे नियम मोडले जातात. थुंकू नका असं लिहिलेलं असूनही नियम मोडले जातात. तरीही तुम्ही प्रवास करताचं ना?. बाहेर जे आहे तेच या घरातही आहे, इथेही नियम मोडले जाणार पणं तुम्ही त्यापासून लांब न जाता जे चूक आहे ते सांगितलं पाहिजे” असं म्हणतात आणि तिला धीर देतात.